flairkarts

Friday, 17 March 2023

मला आवडलेले विचार

🙏

*सूर्य जगाचा आत्मा आहे. त्याची प्रार्थना करताना गायत्री मंत्रात 'सूर्य आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो!'असे म्हटले आहे. भगवद्गीता ही बुद्धीला शरण जावयाला सांगते. भगवंताच्या ठिकाणी स्थिर राहणे ही बुद्धीची कृपा होय. म्हणून मन आणि बुद्धी भगवंताकडे वळून स्थिर होणे ही महत्कृपा म्हणजे बुद्धीची कृपा.भगवंताचे अनुसंधान बुद्धीच्या कृपेने राहाते. अनुसंधानात बाकीचे व्यवहार चालू असतानाही त्यात भगवंताचे स्मरण राहाते. निश्चयात्मक बुद्धी एकच आहे. ती निरंतर भगवंताच्या स्मरणात राहणे तिच्या कृपेनेच शक्य होते. आपले विचार शब्दात चालतात आणि शब्द स्मरण करून देतो. म्हणून एक सारखे भगवंताचे स्मरण राहू लागले, त्याचे नाम घेताना  'तो' आहे, ही जाणीव सतत राहू लागली की, बुद्धीची पूर्ण कृपा झाली असे म्हणता येईल. मी कर्ता नाही, हे उमजूनही जो पर्यंत चिंता, काळजी, दडपण जात नाही, तो पर्यंत बुद्धीची कृपा झाली नाही हे निश्चित समजावे. होवून गेलेल्या घटनांचे मनात येणारे नसते विचार बुद्धीची कृपा झाली तरच थांबतात. मला कळत नाही, असे खरे वाटून साधक जेव्हा सत्पुरुषाच्या चरणी शरण जातो तेव्हाच बुद्धी कृपा करते.*

🙏🙏

No comments:

Post a Comment