flairkarts

Friday, 17 March 2023

मला आवडलेले विचार

🙏

     *मनीचे भाव ओळखायला स्वतःपासून सुरूवात करावी. स्वत:चे चुकते कुठे हे पाहावे. दुःख भोगण्याची माझ्यावर वेळ आली, म्हणजे माझे काहीतरी चुकलेच, असे समजावे. ज्याला दु:खाचा त्रास होत नाही, तोच खरा समाधानी. ’मी दररोज नामस्मरण करतो, अनेक वर्ष माझी सेवा चुकली नाही, असे आपण म्हणतो; पण 'मी हे सर्व करतो’ अशी सारखी आठवण ठेवली तर काय उपयोग ? मी मेहनत घेतो पण थोडक्यात नासते, ते या अभिमानामुळेच ! जोपर्यंत अभिमान सोडून भगवंताचे स्मरण मी करीत नाही तोपर्यंत त्याला ’स्मरण’ कसे म्हणावे ? भगवंताशिवाय इतर जाणीव ठेवून, मी त्याच्याशी अनन्यपणे वागतो असे कसे म्हणता येईल ?  तुमची ही बुद्धी नष्ट झाल्याशिवाय तरणोपाय नाही. सद्गुरूंनी, संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे, म्हणजे मार्ग सापडतो. खरी तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो. आणि खरी कळकळ असली म्हणजे त्यात प्रेम निर्माण होते. ’भगवंताने माझी आपत्ती दूर करावी, हे म्हणणे वेडेपणाचे आहे. संकटे, आपत्ती आल्या म्हणून भगवंताला विसरणे हे केव्हाही योग्य नाही. देहबुद्धीचा नाश नामाच्या स्मरणात आहे खास ! नामात प्रेम येत नाही याचा विचार करीत राहिलो तर नामाचाच विसर पडतो, हे कुठे ध्यानात येते ! उगीच विचार करीत बसू नये. समुद्र ओलांडून जाण्याकरिता रामाचे नाव घेऊन जी वीट ठेवली ती तरली, हे लक्षात ठेवा.*

                                 🙏🙏

मला आवडलेले विचार

🙏

*सूर्य जगाचा आत्मा आहे. त्याची प्रार्थना करताना गायत्री मंत्रात 'सूर्य आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो!'असे म्हटले आहे. भगवद्गीता ही बुद्धीला शरण जावयाला सांगते. भगवंताच्या ठिकाणी स्थिर राहणे ही बुद्धीची कृपा होय. म्हणून मन आणि बुद्धी भगवंताकडे वळून स्थिर होणे ही महत्कृपा म्हणजे बुद्धीची कृपा.भगवंताचे अनुसंधान बुद्धीच्या कृपेने राहाते. अनुसंधानात बाकीचे व्यवहार चालू असतानाही त्यात भगवंताचे स्मरण राहाते. निश्चयात्मक बुद्धी एकच आहे. ती निरंतर भगवंताच्या स्मरणात राहणे तिच्या कृपेनेच शक्य होते. आपले विचार शब्दात चालतात आणि शब्द स्मरण करून देतो. म्हणून एक सारखे भगवंताचे स्मरण राहू लागले, त्याचे नाम घेताना  'तो' आहे, ही जाणीव सतत राहू लागली की, बुद्धीची पूर्ण कृपा झाली असे म्हणता येईल. मी कर्ता नाही, हे उमजूनही जो पर्यंत चिंता, काळजी, दडपण जात नाही, तो पर्यंत बुद्धीची कृपा झाली नाही हे निश्चित समजावे. होवून गेलेल्या घटनांचे मनात येणारे नसते विचार बुद्धीची कृपा झाली तरच थांबतात. मला कळत नाही, असे खरे वाटून साधक जेव्हा सत्पुरुषाच्या चरणी शरण जातो तेव्हाच बुद्धी कृपा करते.*

🙏🙏