flairkarts

Sunday, 30 December 2018

घरगुती मसाले

“घरगुती मसाले”

      सन्माननीय सदस्य “Bhople M Deepak” यांच्या विनंतीवरुन..........

      त्यांच्या स्वादान्न ग्रुपवरील याच विनंतीवरुन अाॅगष्टच्या शेवटी मी ही पोस्ट स्वादान्न ग्रुपवर टाकली होती. कदाचीत त्यांच्या लक्षात आले नसेल म्हणुन त्यांनी “Marathi स्वयंपाक व इतर पदार्थ” या ग्रुपवर पुन्हा विनंती केली अाहे. “sir pls whars app me All masale recipe to me”. त्यावरुन १७ सप्टेबर २०१७ रोजी “Marathi स्वयंपाक व इतर पदार्थ” या ग्रुपवर तीच पोस्ट परत टाकली आहे. अाता आज २६ सप्टेबर २०१७ रोजी  तिसऱ्यांदा त्यांनी “आम्ही सारे खवैय्ये” या ग्रुपवरुन सेम मागणी केली आहे म्हणुन तिच पोस्ट परत या ग्रुपवर टाकत आहे. अाता तरी त्यांनी हि पोस्ट काॅपी करुन ठेवावी. किंवा परत ही मागणी करु नये. दुसरे महत्वाचे म्हणजे हे मसाले माझे नसल्याने यावरील सर्वच शंकाचे निरसन मी करु शकेलच असे नाही.

(विनोद सावंत यांचे विवीध प्रकारचे ३७ घरगुती मसाले काॅपी पेस्ट करुन टाकत आहे.)

मसाले (३७) विनोद सावंत यांचे खास मसाले रेसिपीज ( सावंत यांचा लालबाग ला मोठा व्यवसाय आहे मसाल्यांचा )
# विविध प्रकारचे घरगुती मसाले. #

१) @ सांभर मसाला. @
सांभर करायच्या वेळीच हा सांभर मसाला (Sambhar Masala) ताजाच केला तरी चव अजून छान लागते.
* साहित्य :-
१२० ग्रॅम धणे
८० ग्रॅम जीरे
३० ग्रॅम काळी मिरी
३० ग्रॅम सरसो
३० ग्रॅम मेथी
२० ग्रॅम अख्खी लाल मिरची
३० ग्रॅम हळद
१० ग्रॅम लसणाची पावडर
६० ग्रॅम चण्याची डाळ
६० ग्रॅम उडदाची डाळ
१० ग्रॅम हिंग
तळण्यासाठी तेल.
* कृती :-
दोन्ही डाळी धुवून वाळवून घ्या. कढईत तेल टाकून डाळी सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्या.
डाळी कागदावर टाकून जास्तीचे तेल काढून घ्या.
वरील इतर सामग्री तेलात गरम करुन सर्व एकत्र कुटावे.
एका स्वच्छ व कोरड्या डब्यात भरुन ठेवावा.
सांभर करायच्या वेळीच हा मसाला ताजाच केला तरी चव अजून छान लागते.

२) @ मालवणी मसाला. @
* साहित्य : -
१) १/२ किलो बेडगी मिरची
२) १/२ किलो संकेश्वरी मिरची
३) ५०० ग्राम धणे
४) १२५ ग्राम काळी मिरी
 ५)५० ग्राम दालचिनी
 ६) ५० ग्राम लवंग
 ७) ५० ग्राम जावित्री
 ८) ५० ग्राम चक्रीफुल
९) ५० ग्राम काळी वेलची (मसाला वेलची)
१०) ५० ग्राम मोहरी
११)५० ग्राम बडीशेप
१२) ५० ग्राम खसखस
१३) ५० ग्राम दगडीफुल
 १४) ५० ग्राम तमालपत्र
 १५) २५ ग्राम वेलची
 १६) अडीच जायफळ
१७) ५० ग्राम अख्खी हळद
१८) ५० ग्राम हिंग
 १९) तेल .
* कृती :-
एका भांडयात थोडस तेल गरम करून त्यात मिरची घालून छान परतावी.
मिरच्या छान खमंग लालसर भाजून घ्याव्यात.
मिरच्या कुरकुरीत भाजल्या कि बाजूला काढून घ्याव्यात.
त्याच भांडयात पुन्हा थोडस तेल घालून हळद , हिंग आणि जायफळ सोडून उरलेले वरील मसाले घालावे.
हावे.
मसाले व मिरच्या एका प्लेटमध्ये बाजूला काढून थंड होऊ दयावे.
हे मिश्रण थंड झाले कि मिक्सरला लावून बारीक पूड करून घ्यावी.
पूड थंड झाली कि बरणीमध्ये भरून ठेवावी.

३) @ कोल्हापुरी मसाला. @
* साहित्य :-
१) १ वाटी लाल सुक्या मिरच्या
 २) १/२ वाटी सुख खोबर
३) १ चमचा जिरे
४) १ चमचा धणे
५) २ चमचे पांढरे तिळ
६) १ छोटा चमचा मेथीदाणे
७) १ छोटा चमचा मोहरी
८) १ छोटा चमचा काळी मिरी
९) १ छोटा चमचा तेल
१०) १ छोटा चमचा लवंग
११) २ तमालपत्र
१२) १/२ छोटा चमचा जायफळ पूड
१३) २ चमचे लाल तिखट .
* कृती :-
लाल तिखट व जायफळ पूड वगळून वरील सर्व पदार्थ एकत्र करावे.
१/२ चमचा तेल या पदार्थांना चांगले चोळून घ्यावे.
एक भांड गरम करून त्यात हे पदार्थ घालून मध्यम आचेवर थोडेसे गरम करावे.
खमंग भाजल्यावर एक छान सुगंध येईल मिरच्या व इतर पदार्थ थोडयाशा लालसर भाजल्या कि आचेवरून बाजूला करावे.
जास्त काळपट भाजू नयेत.
भाजलेले मसाले ताटात पसरून ठेवावे.
थंड झाले कि मिक्सरला लावून छान पूड करून घ्यावी.
आता लाल तिखट व जायफळ पूड एकत्र करावे.
हा मसाला एका घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवावा.

४) @ ताक मसाला . @
* साहित्य :-
२५० ग्राम आंबट गोड दही
जिरेपूड, धनेपूड
मीठ
थंडगार पाणी.
* कृती :-
सगळ्यात आधी दहयामधे थंडगार पाणी मिसळून रवीने फ़ेस येईपर्यंत मस्त घुसळून घ्यावे. २ चिमूट जिरेपूड, २ चिमूट धनेपूड आणि २ चिमूट मीठ घालून परत घुसळा. मसाला ताक तय्यार!!!
(आपल्या सिंहगडावरच्या ताकाची आठवण झाल्यावाचून राहणार नाही.)

५) @ दुध मसाला. @
* साहित्य :-
२ कप दुध
३ टेस्पून साखर
मसाल्यासाठी साहित्य:
१/४ कप बदामाची पूड
१ टेस्पून पिस्ता पूड
१/२ टिस्पून वेलचीपूड
चिमूटभर जायफळ पूड
१ चिमूटभर केशर.
* कृती :-
१) मसाला बनवताना न खारवलेले पिस्ता आणि बदाम वापरावेत. त्याची पूड करावी. बदाम पिस्ता पूड, वेलची आणि जायफळ पूड आणि केशर एकत्र मिक्सरवर एकत्र करून घ्यावेत.
२) २ कप दूध गरम करावे. त्यात ३ टेस्पून किंवा आवडीनुसार साखर घालावी. बनवलेला २-३ टिस्पून मसाला घालून ढवळावे. थोडे उकळू द्यावे व गरम गरम सर्व्ह करावे.
* टीप :-
१) मसाला बनवताना इतरही सुकामेवा आवडीनुसार वापरू शकतो.
२) यामध्ये अख्ख्या चारोळ्याही घालू शकतो.
३) मसाल्यात जायफळ प्रमाणातच वापरावे. कारण मसाला दुधाला जायफळाचा जास्त फ्लेवर आला तर ते उग्र लागते.

६) @ मसाला सुपारी .@
* साहित्य :-
बडीशेप - १/४ किलो
धणेडाळ - १/४ किलो
जेष्ठमध पूड - ५० ग्रॅम
ओवा - ५० ग्रॅम
बाळंतशेपा - २५ ग्रॅम
लवंग - ५-६ नग .
* कृती :-
सर्व साहित्य निरनिराळे भाजून घ्यावे. एकत्र करून बारीक दळावे. हवाबंद बरणीत ठेवावे. पाचक आणि आम्लपित्तासाठी उत्तम उपाय.

७) @ गरम मसाला (1). @
* साहित्य :--
२० ग्रॅम काळे मिरे, १० ग्रॅम लवंगा,
२० ग्रॅम दालचिनी, १५ ग्रॅम मसाला वेलदोडे -
सोलून दाणे काढून, ५ ग्रॅम शहाजिरे, १० ग्रॅम जिरे.
* कृती :-
मसाल्याचे सर्व पदार्थ कढईत मंद आचेवर थोडे भाजावेत. सर्व जिन्नस एकत्र बारीक कुटून पूड करून, चाळून घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवावी.

८) @ गरम मसाला (2). @
* प्रमाण :- साधारण १/३ कप.
* साहित्य :-
२ टेबलस्पून धणे ,
२ चमचे जिरे,
१ १/२ टेबलस्पून अख्खे मिरीदाणे,
साधारण २० लवंगा
१ दालचिनीचा तुकडा १ १/२ इंच,
३ टेबलस्पून बडिशेप.
* कृती :-
प्रथम एका स्वच्छ कोरड्या कढईत लवंग, दालचिनी, बडिशेप आणि मिरे मंद आंचेवर खमंग वास सुटेपर्यंत भाजावे व बाजुला काढावे. जास्त लाल होऊ देऊ नये.
त्याच कढईत धणे किंचित तांबुस होईस्तोवर भाजावेत मग त्यात जिरे घालून गॆस बंद करावा.
या सर्व मसाल्यांची बारीक पूड करावी. आणि गार झाल्यावर घटट झाकणाच्या बाटलीत मसाला भरून ठेवावा.
या मसाल्यात बडिशेप असल्याने कुठल्याही भाजीला एक छान स्वाद येतो. हा मसाला वापरून मिश्र भाज्यांचा कुर्मा छानच होतो.
* टीपा :-
वर दिलेल्या प्रमाणात साधारण १/३ कप मसाला होतो. जास्त प्रमाणात करताना त्यातल्या सर्व मसाल्यांचे प्रमाण सारख्याच प्रमाणात वाढवू नये. उदाहरणार्थ, लवंगा जरा जपूनच घालाव्यात. नाहीतर मसाला खूप उग्र/जळजळीत होऊ शकतो.

९) @ कांदा लसूण मसाला. @
* साहित्य :-
काळया मसाल्यात सांगितलेले सर्व मसाल्याचे पदार्थ, लाल सुक्या मिरच्या २०० ग्रॅम, अर्धा किलो कांदे, अदपाव लसूण.
* कृती :-
काळया मसाल्याप्रमाणे सर्व जिन्नस तेलात खमंग भाजून घ्यावेत. सुक्या मिरच्या तेलात तळून मीठ घालून कुटून त्यात मिसळाव्यात. कांदे पातळ उभे चिरून उन्हात चुरचुरीत वाळवावेत. नंतर थोडया तेलात परतून घ्यावेत. लसूणपण सोलून परतून घ्यावा व कांदा - लसूण कुटून तीळ खोबर्‍याच्या पुडीबरोबर मसाल्यात घालावेत. मसाला एकजीव कालवून घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवावा.

१०) @ बिर्याणी मसाला. @
* साहित्य :-
१ चमचा धणे
१ चमचा जिरे
१ चमचा शहाजिरे
१ चमचा बडीशेप
१० हिरवे वेलदोडे
१ काळा वेलदोडा
१-२ जायपत्री
३ इंच दालचीनीचा तुकडा
 २ बदामफूले
१ जायफळ
२-३ जावित्री
१०-१५ मिरे
३ लवंगा .
* कृती :-
जायफळ सोडून वरील सर्व मसाल्याचे पदार्थ वेगवेगळे भाजून घ्यावेत. मंद आचेवर, त्यांतील नैसर्गिक तेले बाहेर येईपर्यंतच हलकेसे भाजावेत. सगळे एकत्र करून, गार झाल्यावर बारीक दळावेत व पूड हवाबंद डब्यात भरून ठेवावी.

११) @ बिर्याणी / पुलाव मसाला. @
* साहित्य :-
जिरे - १ चमचा
धणे - १ चमचा
तेजपत्ता - ५-६ पाने
काळे मिरे - १०-१२ नग
बदामफुल - १ नग
सुकी लाल मिरची - ४-५ नग
वेलदोडे - ३-४ नग
लवंग - ८-१० नग
शहाजिरे - १ चमचा
जायफळ पूड - १/४ चमचा
केशर - ५-६ काड्या
मसाला वेलदोडे - ३-४ नग
खडे मीठ - १ चमचा
दालचिनी - १ इंचाचे २ तुकडे
खसखस - २ चमचे .
* कृती :-
सर्व साहित्य कडकडीत उन्हात नीट कोरडे वाळवून एकत्र करून एकजीव बारीक पूड करावी.

१२) @ सातपाटी मसाला / मासे मसाला. @
* साहित्य :-
ओला नारळाचा चव - २ वाट्या
तांदूळ पिठी - २ चमचे
लिंबूरस - ६ चमचे
धणेपूड - २ चमचे
बडीशेप पूड - १ चमचा
लाल मिरची पेस्ट - १/२ वाटी
हिरवी मिरची आणि कोथिम्बिर पेस्ट - १ वाटी
हळद - १/२ चमचा
मीठ - १/२ चमचा .
* कृती :-
सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटावे. हा मसाला लवकर संपवावा, फार दिवस टिकत नाही. मासे बनविण्यासाठी हा मसाला चांगला.

१३) @ राजस्थानी गरम मसाला .@
* साहित्य :-
तेजपत्ता - ७-८ पाने
काळे मिरे - १ चमचा
दालचिनी - ३-४ बोटभर लांबीचे तुकडे
लवंग - १ चमचा
जायफळ - १/२ नग .
* कृती :-
सर्व पदार्थ कोरडेच एकत्र करून बारीक कुटावेत.

१४) @ पिझ्झा मसाला .@
* साहित्य : -
सुंठपूड - १/४ चमचा
खनिज मीठ / सैंधव - १ चमचा
मीठ - १ चमचा
रोझमरी / गुलाबकळी - १ चमचा
भरड कुटलेली सुकी लाल मिरची - २ चमचे
थाइम - १ चमचा
ओरेगानो - ४ चमचे
बेझील लीव्ज - ४
लसूण पावडर - १ चमचा
सायट्रिक असिड - १/२ चमचा .
* कृती :-
सर्व साहित्य एकत्र कालवावे, चुरून एकजीव करावे. हवाबंद बरणीत ठेवावे.

१५) @ सोलापुरी काळा मसाला .@
* साहित्य :-
लाल सुकी मिरची - १ किलो
खडा हिंग - १ छोटा चमचा
सुंठ - २५ ग्रॅम
दालचिनी - १० ग्रॅम
लवंग - १० ग्रॅम
हळकुंड - २५ ग्रॅम
काळे मिरे - १० ग्रॅम
नाकेशर - २५ ग्रॅम
दगडफूल - २५ ग्रॅम
तमालपत्र - २५ ग्रॅम
रामपत्री - २५ ग्रॅम
बदामफुल - २५ ग्रॅम
शहाजिरे - १५ ग्रॅम
धणे - २५० ग्रॅम
मोहरी - १५ ग्रॅम
खसखस - १५ ग्रॅम
मसाला वेलदोडे - १० ग्रॅम
खोबरे खीस - २५० ग्रॅम
खडे मीठ - १२५ ग्रॅम .
* कृती :-
सर्व मसाले आणि मिरच्या तेलावर भाजून गार करावे. शहाजिरे आणि मीठ घालून कुटावे.
तेलावर भाजण्याचा क्रम - हिंग, फोडलेले हळकुंड, फोडलेली सुंठ, मोहरी, लवंग, मिरे, नाकेशर, दगडफूल, बदामफुल, तमालपत्र, रामपत्री, धणे
खोबरे आणि खसखस तेल न घालता भाजावे. सर्वात शेवटी थोडे थोडे तेल टाकीत मिरच्या भाजाव्यात.

१६) @ पाणीपुरी मसाला / चाट मसाला. @
* साहित्य :-
मीठ - १ चमचा
खनिज मीठ / सैंधव - २ चमचे
लाल तिखट - १/२ चमचा
आमचूर पावडर - २ चमचे
जिरे पूड - १ चमचा
सुंठ पूड - १ चमचा
काळी मिरी पूड - १/२ चमचा
बडीशेप पूड - १ चमचा
शहाजिरे पूड - १/४ चमचा .
* कृती :- सर्व एकत्र करून एकजीव दळून घ्यावे, हवाबंद बाटलीत भरून ठेवावे.

१७) * चाट मसाला :-
* साहित्य :-
५० ग्रॅम जिरे, २५ ग्रॅम धणे,
२० ग्रॅम बडीशेप, १५ ग्रॅम काळी मिरी,
१० ग्रॅम ओवा, १५ ग्रॅम अनार दाणे,
२ग्रॅम दालचिनी, २ ग्रॅम लवंगा,
१० ग्रॅम सूंठ पावडर, ५० ग्रॅम आमचूर पावडर,
१० ग्रॅम मिरची पावडर, ५ ग्रॅम हिंग,
१२५ ग्रॅम साधे मीठ, १ टेबल स्पून काळे मीठ,
१०-१२ वेलची, २ तमालपत्रे,
२५ ग्रॅम सुकी पुदिन्याची पाने, बारिक तुकडा जायफळ,
१ चमचा सायट्रीक अ‍ॅसिड.
* कृती :- सर्व एकत्र करून एकजीव दळून घ्यावे.

१८) @ वैदर्भीय मसाला .@
* साहित्य :-
२५० ग्रॅम धणे, २५ ग्रॅम जिरे, ५ ग्रॅम लवंगा,
५ ग्रॅम दालचिनी, ५ ग्रॅम नागकेशर,
५ ग्रॅम मिरे, ५ ग्रॅम दगडफूल, ५ ग्रॅम तमालपत्र,
५ ग्रॅम जायपत्री, १ जायफळ, २५ ग्रॅम खसखस,
५० ग्रॅम खोबरे, ५० ग्रॅम तीळ, ५० ग्रॅम चणाडाळ.
* कृती :- सर्व साहित्य तेलावर भाजून वाटावे.

१९) @ कोकणी मसाला .@
* साहित्य :-
५०० ग्रॅम धणे, ५०० ग्रॅम मिरच्या, ५० ग्रॅम लवंग,
५० ग्रॅम जायपत्री, ५० ग्रॅम नागकेशर,
५० ग्रॅम मसाला वेलची, ५० ग्रॅम दालचिनी,
५० ग्रॅम दगडफूल, ५० ग्रॅम तमालपत्र, ५० ग्रॅम बडीशेप,
५० ग्रॅम काळे मिरे, ५० ग्रॅम जिरे, ५०ग्रॅम शहाजिरे,
५० ग्रॅम मोहरी, २०० ग्रॅम खसखस, १५ हळकुंडे,
१ चमचा मेथी, १ टेबलस्पून हिंग, २ जायफळे.
* कृती :- सर्व साहित्य तेलावर भाजून वाटावे.

२०) @ गोडा मसाला. (काळा मसाला). @
* साहित्य :-
धणे अर्धा किलो, सुके खोबरे पाव किलो, तीळ पाव किलो, खसखस 50 ग्रॅम, हळकुंडे 50 ग्रॅम, प्रत्येकी 20 ग्रॅम लवंग, दालचिनी, शहाजिरे, काळे मिरे, तमालपत्र, मसाला वेलदोडे, दगडफूल, खडा हिंग, प्रत्येकी 10 ग्रॅम जायपत्री, बाद्यान (बदामफूल), जिरे 100 ग्रॅम.
* कृती :-
खोबरे तुकडे करून वा किसून भाजून घ्या. तीळ कोरडेच भाजून घ्या. बाकीचे सर्व पदार्थ थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्‍सरवर बारीक पूड करा. चाळून घट्ट झाकणाऱ्या बरणीत भरा.

२१) @ पंजाबी गरम मसाला. @
* साहित्य :-
1 टी स्पून धणे, अर्धा टी स्पून जिरे, 1 टी स्पून शहाजिरे,
4 ते 5 तमालपत्रे, अर्धा टी स्पून दालचिनी,
अर्धा टी स्पून काळे मिरे, अर्धा टी स्पून लवंग,
5 मसाला वेलदोडे व पाव जायफळ.
* कृती :-
जायफळ सोडून सर्व मसाला कोरडाच भाजून घ्या. (फार भाजू नका.) नंतर जायफळासहित मिक्‍सरवर पूड करून घ्या.
* टीप :- हा मसाला एकदम जास्त प्रमाणात न करता लागेल तसा थोडाच करावा.

२२) @ कच्चा मसाला. @
* साहित्य :-
अर्धी वाटी धणे, पाव वाटी जिरे, 5 ग्रॅम शहाजिरे,
5 ग्रॅम लवंग व दालचिनीचा 1 छोटा तुकडा.
* कृती :-
सर्व साहित्य कच्चेच मिक्‍सरवर बारीक करून घ्यावे व ही पूड मसालेभात व खिचडी यासाठी वापरावी.

२३) @ पावभाजी मसाला. @
* साहित्य :-
लाल सुक्‍या मिरच्या 50 ग्रॅम, धणे 50 ग्रॅम,
15-20 हिरवे वेलदोडे, 15-20 लवंगा,
7-8 तमालपत्रे, जिरे 20 ग्रॅम, काळे मिरे 10 ग्रॅम,
बडीशेप 20 ग्रॅम, आमचूर पावडर चार टी स्पून,
काळे मीठ 2 टी स्पून, हळद 2 टी स्पून,
सुंठ पावडर 2 टी स्पून.
* कृती :-
सर्व साहित्य वेगवेगळे भाजून घ्या. मिरच्या थोड्या तेलावर भाजून घ्या. गार झाल्यानंतर एकत्र करून बारीक करून घ्या व कोरड्या स्वच्छ बरणीत भरून ठेवा. (कधी कधी बदल म्हणून नेहमीच्या भाज्यांमध्येही वापरता येतो.
२४) @ चाट मसाला. @
* साहित्य :-
दोन टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून शहाजिरे, 2 टेबलस्पून काळे मिरे, 2 टेबलस्पून बडीशेप, अर्धा टी स्पून हिंग पूड, 1 टेबलस्पून आमचूर पावडर, 2 टी स्पून काळे मीठ, चवीनुसार साधे मीठ.
* कृती :-
हिंगपूड थोडी तेलावर परतून घ्या. बाकी सर्व पावडरी सोडून इतर साहित्य किंचित भाजून घ्या व एकत्र करून गार झाल्यावर मिक्‍सरवर बारीक करा. (फ्रूटचाट अगर सॅलडसाठी वापरा.)

२५) @ छोल्यासाठी गरम मसाला .@
* साहित्य :-
दहा हिरवे वेलदोडे, दीड टी स्पून शहाजिरे,
एक टी स्पून जिरे, दीड टी स्पून मिरे,
अर्धा टी स्पून लवंगा, दोन तुकडे दालचिनी,
एक तमालपत्र, पाव टी स्पून सुंठ पावडर.

२६) @ सिंधी गरम मसाला . @
* साहित्य :-
शंभर गॅम मिरे, शंभर गॅम जिरे, शंभर गरग्रॅम दालचिनी,
पन्नास ग्रॅम लवंग, पन्नास ग्रॅम वेलची, पाच तमालपत्र पाने.
*कृती :- सर्व कच्चे कुटून घेणे.

२७) @ धनशाक मसाला .@
* साहित्य :-
[पाव किलो डाळीसाठी] एक टी स्पून मेथी,
एक टी स्पून जिरे, एक टी स्पून फुटाणे,
एक टी स्पून सांबार मसाला, एक टी स्पून मिरी पावडर,
एक टी स्पून लसूण पेस्ट, चार-पाच तुकडे दालचिनी,
तीन लाल मिरच्या, एक ते दीड टी स्पून गरम मसाला.

२८) @ रसम मसाला .@
* साहित्य :-
सात-आठ लाल मिरच्या आणि अर्धा टी स्पून हिंग चमचाभर, तेलावर थोडे परतवून घ्यावे. त्याच कढईत पाव वाटी धणे,
एक टी स्पून जिर, एक टी स्पून मिरी, एक टी स्पून हरभरा- डाळ, तीन टी स्पून तूरडाळ, पाव टी स्पून हळद,
चार-पाच वाललेली कधीलिंबाची पाने.
* कृती :- परतविन गार झाल्यावर पावडर करावी.

२९) @ लिंबू लोणच्याचा मसाला .@
* साहित्य / कृती :-
एक टी स्पून मेथी, आणि एक टी स्पून हिंग,
दोन -तीन टी स्पून तेलावर परतावे. त्यात दोन टी स्पून तिखट, एक टी स्पून हळद घालुन मिक्सरवर दळावे. पावा वाटी गरम करून गार केलेल्या तेलात वरील मसाला व आठ चमचे मीठ घालावे. [ दहा लिंबाच्या फोडी मिसळाव्या.]

३०) @ मिरचीच्या लोणच्याचा मसाला .@
* साहित्य :-
एक टी स्पून मेथी पावडर, एक टी स्पून हिंग पावडर, एक टी स्पून हळद आणि अर्धी वाटी मोहरीची डाळ यांच भरडसर मिश्रण, अर्धी वाटी मीठ, अर्धी वाटी लिंबाचा रस.
* कृती :- कोमट तेलात सर्व मसाला मिसळून घ्यावा.[ पाव किलो मिरच्या चिरून त्यात वरील मिश्रण मिसळावे. ]

३१) @ कैरी लोणचे मसाला .@
* साहित्य / कृती :-
एक टे स्पून मेथी, एक टे.स्पून हिंग थोड्या तेलावर परतवून घ्यावे. त्यात पाऊण वाटी मोहरी डाळ, एक वाटी लाल तिखट, एक टे. स्पून हळद मिसळवून सर्व मसाला कालवावा. [ एक किलो कैरीच्या फोडी त्यात मिसळाव्या.]

३२) @ करी पावडर .@
* साहित्य :-
शंभर ग्रॅम धणे, पन्नास ग्रॅम सुक्या मिरच्या, पंचवीस ग्रॅम मिरे, दोन टी स्पून खसखस, दोन टी स्पून जिरे, दोन टी स्पून शहाजिरे, दोन टी स्पून चणाडाळ, एक टी. स्पून मोहरी, दोन टी.स्पून तीळ, सात आठ लवंगा, सात-आठ वेलदोडे, पाच-सहा दालचिनीचे तुकडे.
* कृती :- सर्व एकत्र कुटावे.

३३) @ थंडाई मसाला .@
* साहित्य / कृती :-
दोन टी स्पून खसखस, दोन टी स्पून मगज, चार-पाच हिरवे वेलदोडे, चार टीस्पून बडीशेप, दहा-बारा बदाम, एक वाटी गुलाबाच्या सुक्या पाकळ्या, एक टी स्पून मिरे. हे सर्व पदार्थ एक वाटी पाण्यात भिजत घालून मग वाटावे. [ दोन लिटर: दूधासाठी ]

३४) @ तंदूरी मसाला. @
* साहित्य / कृती :-
अर्धा टी स्पून सुंठ पावडर, अर्धा टी स्पून आमचूर, दोन ती स्पून लाल तिखट, एक टी स्पून शहाजिर, दोन-तीन दालचिनी तुकडे, सात-आठ लवंगा, तीन चार मसाला वेलदोडे, एक टी स्पून त्यार गरम मसाला, अर्धा टी स्पून पुदीना पावडर.

३५) @ चहा मसाला(1) @
पावसाळ्यात किंवा थंडीत हा चहाचा मसाला (Tea Masala) घालून चहा करावा.
* साहित्य :-
२५ ग्रॅम काळी मिरी
२ टी.स्पून सूंठ पूड
७-८ लवंगा
२-३ दालचिनीच्या काड्या
२-३ वेलदोडे
२-३ बडी वेलची.
* कृती :-
सर्व साहित्य एकत्र करुन बारीक कुटावे व चाळुन ठेवावे.
पावसाळ्यात किंवा थंडीत हा मसाला घालून चहा करावा.

३६) @ चहा मसाला(2)@
* साहित्य :-
४० वेलची (हिरवी)
२५ काळी मिरी
१५ ते १८ लवंग
५ काड्या दालचिनी (२ इंच प्रत्येकी)
१ टेस्पून सुंठ पावडर
३/४ जायफळ, किसलेले.
* कृती :-
१) वेलची सोलून घ्यावी. दालचिनी हाताने तुकडे करून घ्यावी.
२) सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करावे.
* वापर :-
४ कप चहासाठी दीड ते दोन टिस्पून मसाला वापरावा. चहा पावडरबरोबरच हा मसाला घालावा. चहा उकळल्यावर आच बंद करून मिनिटभर झाकण ठेवावे. यामुळे मसाल्याचा स्वाद चहामध्ये चांगला मुरेल.
* टीपा :-
१) काळीमिरी, वेलची, दालचिनी आणि सुंठ यांची फ्रेश पावडर वापरूनही मसाला बनवू शकतो. जर दालचिनीचा स्वाद आवडत असेल तर ती थोडी जास्त घालावी.
२) चहाच्या मसाल्यात वाळवलेली चहाची पाती, बडीशेप आणि थोड्याशाच प्रमाणात चक्रीफूल घालू शकतो.
३) वेलची न सोलता वापरली तरी चालेल.

३७) @ चहा मसाला(3)@
* साहित्य :-
अर्धा कप पेक्षा थोडं जास्त पाणी
अर्धा कप दुध
१ १/४ चमचा चहा पावडर
१ १/२ चमचा साखर
आल्याचा अर्धा सें.मी होईल एवढा तुकडा ठेचून
२ -३ काळी मिरी
२ लवंग
छोटासा दालचिनीचा तुकडा
वेलची (पूड )
* कृती :-
भांड्यात पाणी घेऊन ते गरम होऊ द्या..
थोडा पाणी तापलं कि त्यामध्ये चहा पावडर , मद साखर मग आलं, लवंग , दालचिनी, वेलची आणि वाटल्यास काळी मिरी घाला.
चहा उकळला कि मग त्यामध्ये दुध घालून त्याला उकळी फुटू द्या, म्हणजे चहा ला कच्च्या दुधाचा वास नाही येणार.
मस्त पैकी गाळून घ्या..आणि एनजोय करा..!!!
* टीप : - तुम्हाला दुधातला चहा आवडत असेल, तर दुधाचं प्रमाण जास्त घ्यावं.

     धन्यवाद,
     खुशालसिंग परदेशी.“घरगुती मसाले”

      सन्माननीय सदस्य “Bhople M Deepak” यांच्या विनंतीवरुन..........

      त्यांच्या स्वादान्न ग्रुपवरील याच विनंतीवरुन अाॅगष्टच्या शेवटी मी ही पोस्ट स्वादान्न ग्रुपवर टाकली होती. कदाचीत त्यांच्या लक्षात आले नसेल म्हणुन त्यांनी “Marathi स्वयंपाक व इतर पदार्थ” या ग्रुपवर पुन्हा विनंती केली अाहे. “sir pls whars app me All masale recipe to me”. त्यावरुन १७ सप्टेबर २०१७ रोजी “Marathi स्वयंपाक व इतर पदार्थ” या ग्रुपवर तीच पोस्ट परत टाकली आहे. अाता आज २६ सप्टेबर २०१७ रोजी  तिसऱ्यांदा त्यांनी “आम्ही सारे खवैय्ये” या ग्रुपवरुन सेम मागणी केली आहे म्हणुन तिच पोस्ट परत या ग्रुपवर टाकत आहे. अाता तरी त्यांनी हि पोस्ट काॅपी करुन ठेवावी. किंवा परत ही मागणी करु नये. दुसरे महत्वाचे म्हणजे हे मसाले माझे नसल्याने यावरील सर्वच शंकाचे निरसन मी करु शकेलच असे नाही.

(विनोद सावंत यांचे विवीध प्रकारचे ३७ घरगुती मसाले काॅपी पेस्ट करुन टाकत आहे.)

मसाले (३७) विनोद सावंत यांचे खास मसाले रेसिपीज ( सावंत यांचा लालबाग ला मोठा व्यवसाय आहे मसाल्यांचा )
# विविध प्रकारचे घरगुती मसाले. #

१) @ सांभर मसाला. @
सांभर करायच्या वेळीच हा सांभर मसाला (Sambhar Masala) ताजाच केला तरी चव अजून छान लागते.
* साहित्य :-
१२० ग्रॅम धणे
८० ग्रॅम जीरे
३० ग्रॅम काळी मिरी
३० ग्रॅम सरसो
३० ग्रॅम मेथी
२० ग्रॅम अख्खी लाल मिरची
३० ग्रॅम हळद
१० ग्रॅम लसणाची पावडर
६० ग्रॅम चण्याची डाळ
६० ग्रॅम उडदाची डाळ
१० ग्रॅम हिंग
तळण्यासाठी तेल.
* कृती :-
दोन्ही डाळी धुवून वाळवून घ्या. कढईत तेल टाकून डाळी सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्या.
डाळी कागदावर टाकून जास्तीचे तेल काढून घ्या.
वरील इतर सामग्री तेलात गरम करुन सर्व एकत्र कुटावे.
एका स्वच्छ व कोरड्या डब्यात भरुन ठेवावा.
सांभर करायच्या वेळीच हा मसाला ताजाच केला तरी चव अजून छान लागते.

२) @ मालवणी मसाला. @
* साहित्य : -
१) १/२ किलो बेडगी मिरची
२) १/२ किलो संकेश्वरी मिरची
३) ५०० ग्राम धणे
४) १२५ ग्राम काळी मिरी
 ५)५० ग्राम दालचिनी
 ६) ५० ग्राम लवंग
 ७) ५० ग्राम जावित्री
 ८) ५० ग्राम चक्रीफुल
९) ५० ग्राम काळी वेलची (मसाला वेलची)
१०) ५० ग्राम मोहरी
११)५० ग्राम बडीशेप
१२) ५० ग्राम खसखस
१३) ५० ग्राम दगडीफुल
 १४) ५० ग्राम तमालपत्र
 १५) २५ ग्राम वेलची
 १६) अडीच जायफळ
१७) ५० ग्राम अख्खी हळद
१८) ५० ग्राम हिंग
 १९) तेल .
* कृती :-
एका भांडयात थोडस तेल गरम करून त्यात मिरची घालून छान परतावी.
मिरच्या छान खमंग लालसर भाजून घ्याव्यात.
मिरच्या कुरकुरीत भाजल्या कि बाजूला काढून घ्याव्यात.
त्याच भांडयात पुन्हा थोडस तेल घालून हळद , हिंग आणि जायफळ सोडून उरलेले वरील मसाले घालावे.
हावे.
मसाले व मिरच्या एका प्लेटमध्ये बाजूला काढून थंड होऊ दयावे.
हे मिश्रण थंड झाले कि मिक्सरला लावून बारीक पूड करून घ्यावी.
पूड थंड झाली कि बरणीमध्ये भरून ठेवावी.

३) @ कोल्हापुरी मसाला. @
* साहित्य :-
१) १ वाटी लाल सुक्या मिरच्या
 २) १/२ वाटी सुख खोबर
३) १ चमचा जिरे
४) १ चमचा धणे
५) २ चमचे पांढरे तिळ
६) १ छोटा चमचा मेथीदाणे
७) १ छोटा चमचा मोहरी
८) १ छोटा चमचा काळी मिरी
९) १ छोटा चमचा तेल
१०) १ छोटा चमचा लवंग
११) २ तमालपत्र
१२) १/२ छोटा चमचा जायफळ पूड
१३) २ चमचे लाल तिखट .
* कृती :-
लाल तिखट व जायफळ पूड वगळून वरील सर्व पदार्थ एकत्र करावे.
१/२ चमचा तेल या पदार्थांना चांगले चोळून घ्यावे.
एक भांड गरम करून त्यात हे पदार्थ घालून मध्यम आचेवर थोडेसे गरम करावे.
खमंग भाजल्यावर एक छान सुगंध येईल मिरच्या व इतर पदार्थ थोडयाशा लालसर भाजल्या कि आचेवरून बाजूला करावे.
जास्त काळपट भाजू नयेत.
भाजलेले मसाले ताटात पसरून ठेवावे.
थंड झाले कि मिक्सरला लावून छान पूड करून घ्यावी.
आता लाल तिखट व जायफळ पूड एकत्र करावे.
हा मसाला एका घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवावा.

४) @ ताक मसाला . @
* साहित्य :-
२५० ग्राम आंबट गोड दही
जिरेपूड, धनेपूड
मीठ
थंडगार पाणी.
* कृती :-
सगळ्यात आधी दहयामधे थंडगार पाणी मिसळून रवीने फ़ेस येईपर्यंत मस्त घुसळून घ्यावे. २ चिमूट जिरेपूड, २ चिमूट धनेपूड आणि २ चिमूट मीठ घालून परत घुसळा. मसाला ताक तय्यार!!!
(आपल्या सिंहगडावरच्या ताकाची आठवण झाल्यावाचून राहणार नाही.)

५) @ दुध मसाला. @
* साहित्य :-
२ कप दुध
३ टेस्पून साखर
मसाल्यासाठी साहित्य:
१/४ कप बदामाची पूड
१ टेस्पून पिस्ता पूड
१/२ टिस्पून वेलचीपूड
चिमूटभर जायफळ पूड
१ चिमूटभर केशर.
* कृती :-
१) मसाला बनवताना न खारवलेले पिस्ता आणि बदाम वापरावेत. त्याची पूड करावी. बदाम पिस्ता पूड, वेलची आणि जायफळ पूड आणि केशर एकत्र मिक्सरवर एकत्र करून घ्यावेत.
२) २ कप दूध गरम करावे. त्यात ३ टेस्पून किंवा आवडीनुसार साखर घालावी. बनवलेला २-३ टिस्पून मसाला घालून ढवळावे. थोडे उकळू द्यावे व गरम गरम सर्व्ह करावे.
* टीप :-
१) मसाला बनवताना इतरही सुकामेवा आवडीनुसार वापरू शकतो.
२) यामध्ये अख्ख्या चारोळ्याही घालू शकतो.
३) मसाल्यात जायफळ प्रमाणातच वापरावे. कारण मसाला दुधाला जायफळाचा जास्त फ्लेवर आला तर ते उग्र लागते.

६) @ मसाला सुपारी .@
* साहित्य :-
बडीशेप - १/४ किलो
धणेडाळ - १/४ किलो
जेष्ठमध पूड - ५० ग्रॅम
ओवा - ५० ग्रॅम
बाळंतशेपा - २५ ग्रॅम
लवंग - ५-६ नग .
* कृती :-
सर्व साहित्य निरनिराळे भाजून घ्यावे. एकत्र करून बारीक दळावे. हवाबंद बरणीत ठेवावे. पाचक आणि आम्लपित्तासाठी उत्तम उपाय.

७) @ गरम मसाला (1). @
* साहित्य :--
२० ग्रॅम काळे मिरे, १० ग्रॅम लवंगा,
२० ग्रॅम दालचिनी, १५ ग्रॅम मसाला वेलदोडे -
सोलून दाणे काढून, ५ ग्रॅम शहाजिरे, १० ग्रॅम जिरे.
* कृती :-
मसाल्याचे सर्व पदार्थ कढईत मंद आचेवर थोडे भाजावेत. सर्व जिन्नस एकत्र बारीक कुटून पूड करून, चाळून घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवावी.

८) @ गरम मसाला (2). @
* प्रमाण :- साधारण १/३ कप.
* साहित्य :-
२ टेबलस्पून धणे ,
२ चमचे जिरे,
१ १/२ टेबलस्पून अख्खे मिरीदाणे,
साधारण २० लवंगा
१ दालचिनीचा तुकडा १ १/२ इंच,
३ टेबलस्पून बडिशेप.
* कृती :-
प्रथम एका स्वच्छ कोरड्या कढईत लवंग, दालचिनी, बडिशेप आणि मिरे मंद आंचेवर खमंग वास सुटेपर्यंत भाजावे व बाजुला काढावे. जास्त लाल होऊ देऊ नये.
त्याच कढईत धणे किंचित तांबुस होईस्तोवर भाजावेत मग त्यात जिरे घालून गॆस बंद करावा.
या सर्व मसाल्यांची बारीक पूड करावी. आणि गार झाल्यावर घटट झाकणाच्या बाटलीत मसाला भरून ठेवावा.
या मसाल्यात बडिशेप असल्याने कुठल्याही भाजीला एक छान स्वाद येतो. हा मसाला वापरून मिश्र भाज्यांचा कुर्मा छानच होतो.
* टीपा :-
वर दिलेल्या प्रमाणात साधारण १/३ कप मसाला होतो. जास्त प्रमाणात करताना त्यातल्या सर्व मसाल्यांचे प्रमाण सारख्याच प्रमाणात वाढवू नये. उदाहरणार्थ, लवंगा जरा जपूनच घालाव्यात. नाहीतर मसाला खूप उग्र/जळजळीत होऊ शकतो.

९) @ कांदा लसूण मसाला. @
* साहित्य :-
काळया मसाल्यात सांगितलेले सर्व मसाल्याचे पदार्थ, लाल सुक्या मिरच्या २०० ग्रॅम, अर्धा किलो कांदे, अदपाव लसूण.
* कृती :-
काळया मसाल्याप्रमाणे सर्व जिन्नस तेलात खमंग भाजून घ्यावेत. सुक्या मिरच्या तेलात तळून मीठ घालून कुटून त्यात मिसळाव्यात. कांदे पातळ उभे चिरून उन्हात चुरचुरीत वाळवावेत. नंतर थोडया तेलात परतून घ्यावेत. लसूणपण सोलून परतून घ्यावा व कांदा - लसूण कुटून तीळ खोबर्‍याच्या पुडीबरोबर मसाल्यात घालावेत. मसाला एकजीव कालवून घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवावा.

१०) @ बिर्याणी मसाला. @
* साहित्य :-
१ चमचा धणे
१ चमचा जिरे
१ चमचा शहाजिरे
१ चमचा बडीशेप
१० हिरवे वेलदोडे
१ काळा वेलदोडा
१-२ जायपत्री
३ इंच दालचीनीचा तुकडा
 २ बदामफूले
१ जायफळ
२-३ जावित्री
१०-१५ मिरे
३ लवंगा .
* कृती :-
जायफळ सोडून वरील सर्व मसाल्याचे पदार्थ वेगवेगळे भाजून घ्यावेत. मंद आचेवर, त्यांतील नैसर्गिक तेले बाहेर येईपर्यंतच हलकेसे भाजावेत. सगळे एकत्र करून, गार झाल्यावर बारीक दळावेत व पूड हवाबंद डब्यात भरून ठेवावी.

११) @ बिर्याणी / पुलाव मसाला. @
* साहित्य :-
जिरे - १ चमचा
धणे - १ चमचा
तेजपत्ता - ५-६ पाने
काळे मिरे - १०-१२ नग
बदामफुल - १ नग
सुकी लाल मिरची - ४-५ नग
वेलदोडे - ३-४ नग
लवंग - ८-१० नग
शहाजिरे - १ चमचा
जायफळ पूड - १/४ चमचा
केशर - ५-६ काड्या
मसाला वेलदोडे - ३-४ नग
खडे मीठ - १ चमचा
दालचिनी - १ इंचाचे २ तुकडे
खसखस - २ चमचे .
* कृती :-
सर्व साहित्य कडकडीत उन्हात नीट कोरडे वाळवून एकत्र करून एकजीव बारीक पूड करावी.

१२) @ सातपाटी मसाला / मासे मसाला. @
* साहित्य :-
ओला नारळाचा चव - २ वाट्या
तांदूळ पिठी - २ चमचे
लिंबूरस - ६ चमचे
धणेपूड - २ चमचे
बडीशेप पूड - १ चमचा
लाल मिरची पेस्ट - १/२ वाटी
हिरवी मिरची आणि कोथिम्बिर पेस्ट - १ वाटी
हळद - १/२ चमचा
मीठ - १/२ चमचा .
* कृती :-
सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटावे. हा मसाला लवकर संपवावा, फार दिवस टिकत नाही. मासे बनविण्यासाठी हा मसाला चांगला.

१३) @ राजस्थानी गरम मसाला .@
* साहित्य :-
तेजपत्ता - ७-८ पाने
काळे मिरे - १ चमचा
दालचिनी - ३-४ बोटभर लांबीचे तुकडे
लवंग - १ चमचा
जायफळ - १/२ नग .
* कृती :-
सर्व पदार्थ कोरडेच एकत्र करून बारीक कुटावेत.

१४) @ पिझ्झा मसाला .@
* साहित्य : -
सुंठपूड - १/४ चमचा
खनिज मीठ / सैंधव - १ चमचा
मीठ - १ चमचा
रोझमरी / गुलाबकळी - १ चमचा
भरड कुटलेली सुकी लाल मिरची - २ चमचे
थाइम - १ चमचा
ओरेगानो - ४ चमचे
बेझील लीव्ज - ४
लसूण पावडर - १ चमचा
सायट्रिक असिड - १/२ चमचा .
* कृती :-
सर्व साहित्य एकत्र कालवावे, चुरून एकजीव करावे. हवाबंद बरणीत ठेवावे.

१५) @ सोलापुरी काळा मसाला .@
* साहित्य :-
लाल सुकी मिरची - १ किलो
खडा हिंग - १ छोटा चमचा
सुंठ - २५ ग्रॅम
दालचिनी - १० ग्रॅम
लवंग - १० ग्रॅम
हळकुंड - २५ ग्रॅम
काळे मिरे - १० ग्रॅम
नाकेशर - २५ ग्रॅम
दगडफूल - २५ ग्रॅम
तमालपत्र - २५ ग्रॅम
रामपत्री - २५ ग्रॅम
बदामफुल - २५ ग्रॅम
शहाजिरे - १५ ग्रॅम
धणे - २५० ग्रॅम
मोहरी - १५ ग्रॅम
खसखस - १५ ग्रॅम
मसाला वेलदोडे - १० ग्रॅम
खोबरे खीस - २५० ग्रॅम
खडे मीठ - १२५ ग्रॅम .
* कृती :-
सर्व मसाले आणि मिरच्या तेलावर भाजून गार करावे. शहाजिरे आणि मीठ घालून कुटावे.
तेलावर भाजण्याचा क्रम - हिंग, फोडलेले हळकुंड, फोडलेली सुंठ, मोहरी, लवंग, मिरे, नाकेशर, दगडफूल, बदामफुल, तमालपत्र, रामपत्री, धणे
खोबरे आणि खसखस तेल न घालता भाजावे. सर्वात शेवटी थोडे थोडे तेल टाकीत मिरच्या भाजाव्यात.

१६) @ पाणीपुरी मसाला / चाट मसाला. @
* साहित्य :-
मीठ - १ चमचा
खनिज मीठ / सैंधव - २ चमचे
लाल तिखट - १/२ चमचा
आमचूर पावडर - २ चमचे
जिरे पूड - १ चमचा
सुंठ पूड - १ चमचा
काळी मिरी पूड - १/२ चमचा
बडीशेप पूड - १ चमचा
शहाजिरे पूड - १/४ चमचा .
* कृती :- सर्व एकत्र करून एकजीव दळून घ्यावे, हवाबंद बाटलीत भरून ठेवावे.

१७) * चाट मसाला :-
* साहित्य :-
५० ग्रॅम जिरे, २५ ग्रॅम धणे,
२० ग्रॅम बडीशेप, १५ ग्रॅम काळी मिरी,
१० ग्रॅम ओवा, १५ ग्रॅम अनार दाणे,
२ग्रॅम दालचिनी, २ ग्रॅम 

No comments:

Post a Comment