[29/11/2018, 9:31 am] Vithaldas Modagekar: रामरक्षा कथा
एकदा माता पार्वतीने शंकारांस विचारले, “जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का?”
तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या ‘रामरक्षा’ स्तोत्रविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे. ती अशी:
आद्य-कवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. १०० कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्यामध्ये खूप वाद झाले. शेवटी श्ंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले.
१०० ही सम संख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात ३२ अक्षरे होते. त्याचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वत:कडे ठेवली. ते म्हणाले,”ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो” असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास संगितले व ध्यानासाठी बसले.
पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्वाचे असणार म्हणून सर्व जण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जावू लागले. एक ऋषि मात्र शेवटपर्यंत थांबले. त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याचवेळी शंकर ध्यानातून बाहेर आले.
त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जावून ‘रामरक्षा’ सांगितली. काही काळाने ऋषींना जाग आली. आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा ‘रामरक्षेची’ निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव होते ‘बुधकौशिक’ ऋषी. याचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे.
आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर : || तथा लिखितवान्प्रात:प्रबुध्हो बुधकौशिक : ||
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी: शतकोटीचे बीज म्हणजे राम हि ती दोन अक्षरे.
[29/11/2018, 9:33 am] Vithaldas Modagekar: 🔱🏹🚩
*- रामरक्षेची उत्पत्ती -*
~~~~~s~~~~~~
रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की, "एकदा माता पार्वतीने शंकारांस विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का ? "तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या 'रामरक्षा' स्तोत्रविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे.
ती अशी की, आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. १०० कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्यामध्ये खूप वाद झाले.
शेवटी श्ंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. १०० ही सम संख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात ३२ अक्षरे होते. त्याचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वत:कडे ठेवली.
ते म्हणाले," ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो " असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास संगितले व ध्यानासाठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्वाचे असणार म्हणून सर्व जण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जावू लागले. एक ऋषि मात्र शेवटपर्यंत थांबले.
त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याचवेळी शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जावून 'रामरक्षा' सांगितली.
काही काळाने ऋषींना जाग आली. आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा 'रामरक्षेची ' निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव होते 'बुधकौशिक' ऋषी.
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ----------शतकोटीचे बीज म्हणजे राम हि ती दोन अक्षरे.
‘श्रीरामरक्षा’ ह्या स्तोत्राचे महत्व काय?
बुधकौशिक ऋषिंच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभनी. रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे.
हातपाय धुवून, शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ति उत्पन्न होते व ती आपले सदा सर्वकाळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच.
रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊवेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झालेच. याचा अनुभव आल्याशिवाय राहात नाही.
रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे.
राम राम!
आपण कधी विचार केला आहे का , की आपण "राम-राम" दोन वेळेस का म्हणतो.कारण~~~~~|-
र = २७ वा शब्द. ( क ख ग घ ड..........)
आ = २ रा शब्द. (अ आ..)
म = २५ वा शब्द शब्द.(अ आ............)
एकूण = ५४.
राम + राम.
५४+५४ = १०८.
आपण जी गळ्यात माळ घालता तिचे मणि सुद्धा १०८ असतात.
ह्याचा अर्थ = आपण एका व्यक्तीला जर दोनदा "राम-राम" म्हटले तर आपण एक माळ जप केला असा होतो.....तर मग म्हणा की मंडळी ....
राम राम ....
🙏🙏🙏🙏
~~~~🙏🙏~~~
रामरक्षेच्या एका श्लोकाबद्दल- कदाचित माहिती असेलही सगळ्यांना....
रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे ।
रामेणाभिहतो निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो$सम्यहम् ।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।
या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत. रामो=रामः(प्रथमा) रामं(द्वितीया), रामेण(तृतीया), रामाय(चतुर्थी), रामान्नास्ति=रामात् (पंचमी)रामस्य(षष्ठी), रामे(सप्तमी),भो राम(संबोधन).
ह्या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हणल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे (किंवा जीभ जड असलेले) होत नाही.
: रामरक्षा: आरोग्यरक्षक कवच!!!
एक वेगळा पैलू तुमच्यासमोर मांडत आहे. श्रीरामरक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरांमध्ये तिन्हीसांजेला आवर्जून म्हटले जाते. आजारी व्यक्ती वा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते. रामरक्षाच का? असे काय रहस्य या मंत्रात दडले आहे?
रामनामकवच:
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।
स्कंधौ दिव्यायुधः पातुभुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥८॥
जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।
पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥
असे कवच या स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे!! थोडक्यात; आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे!!!
रामरक्षा सिद्ध कशी करावी?
121 रोज एकदा ठराविक ठिकाणी ठरावीक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते किंवा
गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज 13 वेळा...किंवा
अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज 13 वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते.
इतर फायदे:
आपदामपहर्तारम.....हा श्लोक 1 लक्ष वेळा म्हणल्याचे ऋणमुक्ती हे फळ आहे.
संपूर्ण रामरक्षेचे 15000 पाठ केल्याने रामरक्षा सिद्ध हो
जय श्रीराम!!
*🏹॥जय श्रीराम॥🚩*
[15/12/2018, 1:24 pm] Vithaldas Modagekar: *तुळ राशी - फक्त जून ते ऑगस्ट काळजी घ्या, बाकी वर्ष तुमचेच...*
२०१९ या नववर्षामध्ये तुळ राशीचे लोक म्हणजे समजुतदार लोक अधिक समजूतदार होणार आहेत. कारण तुळ राशीसाठी हे नववर्ष अत्यंत लाभाचं ठरणार आहे. फक्त जून ते ऑगस्ट या कालखंडामध्ये आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. बाकी संपूर्ण वर्ष तुळ राशीसाठी लाभाचंच ठरणार आहे. मधल्या कालखंडात काळजी का घ्यावी लागणार आहे व इतर कालखंडात तुळ राशीचे ग्रहमान कसे असणार आहेत याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया...
सर्वात आधी आपण तुळ राशीचे स्वभाव वैशिष्ट्ये जाणून घेऊया. आधी सांगितल्याप्रमाणे या राशीचे लोक हे अत्यंत समजूतदार असतात. हातात तराजु घेतलेला पुरुष हे तुळ राशीचे प्रतिक आहे. त्यानुसार प्रत्येक गोष्ट तोलून-मापून करणे हा या राशीच्या लोकांचा स्वाभाविक गुण ठरतो. ही वायुतत्त्वाची राशी आहे. सदैव प्रसन्नता, मधुर बोलणे, वागणे यामुळे हे लोक प्रत्येकवेळी प्रत्येकठिकाणी समोरच्याला जिंकून घेतात. या राशीच्या लोकांचं अजुन एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ह्या लोकांचा वावर खूप सा-या क्षेत्रांमध्ये असतो. त्यांना विविध क्षेत्रांमध्ये रस असतो. फक्त रसच नसतो तर विविध क्षेत्रांमधील ज्ञान या लोकांकडे असते. जीवनामध्ये कला, काव्य, नाटक, आध्यात्मिकता यांचा सुरेख संगम हे लोक साधत असतात. त्यामुळे तुळ राशीचे लोक उत्तम श्रावण, दर्शक, श्रोता व ग्रहण करणारेही असतात. समोरच्या वक्तीला अगदी उत्तम पद्धतीने समजून घेण्याची कला या राशीच्या लोकांना अवगत असते. आपली मर्यादा न सोडता ते प्रत्येक गोष्टीचा समतोल साधत असतात. म्हणूनच ते इतर राशींच्या लोकांच्या तुलनेत अधिक समजूतदार ठरत असतात.
२०१९ हे नववर्ष तुळ राशीसाठी लाभाचं ठरणार आहे. कारण ग्रहांची शानदार बैठक या राशीसाठी वर्षभर असणार आहे. त्रिक स्थानात पापग्रह शुभ फळ देत असतात. शनि तृतीयात, मंगळ षष्टात यांच्या जोडीला दशमातून राहू तुळ राशीच्या लोकांना कर्म प्रधान बनवित आहे.
सोबतच धनस्थानात गुरु व शुक्र यांचा शंखयोग व राहू - गुरु यांचा नवपचंम योग आपल्यासाठी लाभदारक ठरणार आहे.
थोडक्यात २०१९ या नववर्षाच्या सुरुवातीलाच सर्व ग्रहाचं सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. फक्त काही कालखंड वगळता सर्व ग्रह तुमच्यासाठी अनुकूल असेच आहे. तेच तुमच्या कर्माची दिशा व तुमचं भाग्य ठरविणार आहेत.
तुळ लग्नाचे भाग्य ठरविणारे ग्रह म्हणजे शनि, बुध आणि शुक्र होय. तर कर्माचे कारक शनि, शुक्र, चंद्र आणि मंगळ होय. सर्व ग्रह आपल्यासाठी प्रगतीचा अनुकूल असे शुभयोग घेऊन येणार आहेत.
तुळ राशीच्या लग्नाचे राजयोगकारक शनि महाराज तृतीय स्थानात वर्षभर राहणार आहेत. त्रिक स्थानातील पापग्रह शुभफळ देत असतात. त्यास अनुसरुन शनि महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर वर्षभर निरंतर राहणार आहेत.
शनि महाराजांच्या या कृपेमुळे व्यवसाय, नोकरी, पदोन्नती, आर्थिक लाभ या सर्वच दृष्टीने २०१९ हे नववर्ष तुळ राशीसाठी लाभदायक असणार आहे.
दि. ०६ फेब्रुवारी ते २१ मार्च २०१९ या कालखंडात मंगळ तुमच्या सप्तमात राहणार आहे. मंगळ हा व्यापार स्थानाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे व्यापार, उद्योग, व्यवसाय यांना या काळामध्ये नवी दिशा मिळू शकते. सर्व व्यापारी बंधू-भगिनींनी या ग्रहयोगाचा योग्य तो लाभ करुन घ्यायला हवा.
दि. १५ एप्रिल २०१९ ला तुमचा राशीस्वामी मिन राशीत उच्चीचा होतोय आणि याच दिवसापासून ते दि. १५ मे २०१९ पर्यंत सर्व प्रकारचे लाभ देणारा तुमचा लाभेष ग्रह रवि उच्चीचा होतोय. ग्रहांची ही बैठक व्यापार, नोकरी, व्यवसाय आदी सर्वच क्षेत्रामध्ये फार मोठा लाभ देणारी आहे.
दि. २२ जून ते ०७ ऑगस्ट २०१९ या कालखंडात तुमच्या व्यवसायाचा व जोडीदाराचा स्वामी मंगळ दशमात निचीचा होतोय. हाच तो कालखंड ज्यामध्ये तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. थोडी सावधानता बाळगावी लागणार आहे. कारण या कालखंडात व्यापारात नुकसान, पैसे फसणे, चुकीचे निर्णय घेतले जाणे, जोडीदाराशी वादविवाद अशा अनर्थ घडविणा-या सर्वच घटना घडण्याचे योग आहेत. काळजी घ्या, बेसावध राहू नका.
दि. ०९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०१९ या कालखंडात तुमचा राशीस्वामी व्ययात निचीचा होतोय. ज्यामुळे अतिरीक्त कारणांवर खर्च, घरासह ऑफिसमध्येही वादविवाद, शान-शौकित राहणे, प्रवासावर भरमसाट खर्च, परदेशी जाण्याची संधी आदी गोष्टी घडण्याचे योग जुळून येत आहेत. आता यातील आपल्यासाठी फायद्याचे काय व तोट्याचे काय? हे आपल्याला ठरविता येणे गरजेचे आहे. ते ठरविता आले म्हणजे या कालखंडाचाही योग्य तो लाभ आपण मिळवू शकता.
दि. ०५ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारा गुरुबदल हा तुमच्या पराक्रमात वाढ करणारा आहे. गुरु महाराजांची ही कृपादृष्टी आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. कारण गुरु महारांची ही कृपा आपल्याला देशात व विदेशात भ्रमणाची संधी तर देतच आहे, सोबतच इतरही लाभ संभवू शकतात. फक्त तुम्ही काय पदरात पाडून घेता, ते तुमच्यावरच अवलंबून आहे.
थोडक्यात जून ते ऑगस्ट फक्त या कालखंडात थोडी काळजी घेतली, थोडी सावधानता बाळगून संवाद व्यवस्थित ठेवल्यास २०१९ हे संपूर्ण वर्ष आपल्यासाठी लाभ देणारेच ठरणार आहे. आयुष्यात संधी नेहमी मिळत असतात. काही वेळेला भाग्याची साथ नसेल तर पात्रता असूनही फळ मिळत नाही. मात्र हे नववर्ष आपल्यासाठी संधी व भाग्याची साथ असं दोघं घेऊन आलेला आहे. आता त्याचा तुम्ही किती लाभ घेता, हे सर्वस्वी तुमच्यावरच अवलंबून आहे.
शु्भम भवतू!
*ज्योतिष भास्कर सौ. ज्योती जोशी*
श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्र
जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजुस, दीपस्तंभ फाऊंडेशनच्या समोर, जळगाव
संपर्क क्र. ९८५०० ९८६८८
forward करा .नाव आणि नंबर सह
*अधिक माहितीसाठी भेट द्या -*
वेबसाईट - www.jyotish-kendra.com
https://fb.me/shrijyotishsanshodhankendra
सतत नवनवीन माहिती मिळवण्यासाठी जॉईन व्हा आमच्या ग्रुप ला:
अभ्यास ज्योतीष शास्त्राचा: https://www.facebook.com/groups/1706079612852287/
आवड ज्योतीषशास्त्राची: https://www.facebook.com/groups/2151345388416803/
[25/12/2018, 8:16 am] Vithaldas Modagekar: खजूर बदामाचा एगलेस केक (Date Almond Eggless Cake)
ख्रिसमस / नवीन वर्षासाठी स्वादिष्ट केक बनवायचाय? हा केक करून बघा. खजूर आणि बदाम (किंवा कोणतेही सुके मेवे ) घालून बनवलेला हा एगलेस केक करायला अगदी सोपा आहे.
साहित्य
मैदा १ कप
खजूर १८
पाऊण कप
साखर अर्धा कप (मी ब्राऊन साखर वापरते; साधी साखर ही वापरू शकता)
बटर / अर्धा कप (ह्या केक मध्ये तेल घातलं तरी चालते)
बेकिंग सोडा १ चमचा
बदाम २०-२५
दालचिनी पूड पाव चमचा
मीठ चिमूटभर
कृती
१. खजुराच्या बिया काढून टाका. आणि खजूर कोमट दुधात अर्धा तास भिजवून ठेवा.
२. मैदा, बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र २-३ वेळा चाळून घ्या.
३. बदाम ३-४ मिनिटं पाण्यात उकळून थंड करा. सालं काढून टाकून बदामाचे काप करा.
४. खजूर आणि साखर मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्या. खजूर भिजवलेलं दूध ही वाटताना घाला.
५. खजुराची पेस्ट एका बाउल मध्ये काढून त्यात बटर / तेल घालून मिक्स करा.
६. ओव्हन १८० डिग्री सेंटीग्रेड वर प्री हीट करा. केकच्या ट्रे ला तूप लावून ठेवा.
७. २-२ चमचे मैदा मिश्रणात घालून मिक्स करा.
८. सगळा मैदा मिक्स केल्यावर मिश्रणात बदामाचे काप (थोडे काप सजावटीसाठी ठेवा), दालचिनी पूड घालून मिक्स करा.
९. मिश्रण केकच्या ट्रे मध्ये घाला. वरून बदामाचे काप घाला.
१०. ओव्हन मध्ये ३०-३५ मिनिटं बेक करा.
११. खजूर बदामाचा स्वादिष्ट केक तयार आहे.
टीप
१. प्रत्येक ओव्हन च टेम्परेचर सेटिंग वेगवेगळं असतं. तुमच्या ओव्हन च्या अंदाजानुसार बेकिंग ची वेळ सेट करा.
#datealmondcake #datecake #egglesscake #ASK114
Feel free to share my recipe along with my name. Also you can share the link of my blog with your friends / relatives.
माझी रेसिपी नावासकट शेअर करायला माझी हरकत नाही. माझ्या ब्लॉग ची लिंक पण तुमच्या मित्र / मैत्रिणी / नातलगांबरोबर शेअर करू शकता.
For many more delicious, nutritious recipes, visit my blog
http://MyFamilyRecipes.kunkalienkar.com; for getting notifications of new posts write a comment for any post and click on ‘Notify me of new posts by email’. (ब्लॉगवर ही रेसिपी मराठीत सुद्धा आह़े )
OR visit my FB page MyFamilyRecipes and click like to get notifications of new posts.
[15/04, 12:42 pm] Vithaldas Modagekar: संजीवन समाधी याचा शब्दशः अर्थ म्हणजे समाधीत जिवंत असणे हा आहे. पण याचा खरा अर्थ म्हणजे हि समाधी न संपणारी असते त्याला अक्षय निर्वाण समाधी असे सुद्धा म्हटले जाते.
संजीवन समाधी घेतल्यावर शरिरातील पंचमहाभूते ब्रह्मांडातील पंचतत्त्वांशी एकरूप होऊन विरून जात असल्याने त्या ठिकाणी फक्त चैतन्य, ऊर्जा किंवा स्पंदने शिल्लक राहते. तसेच अशी समाधी घेणार्यांना पंचमहाभूतांतून हे सगळे पुन्हा गोळा करून शरीर धारण करणे शक्य असणे.
पातंजलयोगशास्त्र नुसार जेव्हा एखादा साधू वा संत संजीवन समाधी घेतो, तेव्हा तो पंचमहाभूतात्मक होतो. आपले शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प होते, त्याला देहभान उरत नाही.
याचा अर्थ त्याच्या शरिरातील पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश हे भाग बाहेरच्या ब्रह्मांडातील पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांत विरून जातात, एकरूप होऊन जातात. ज्यांचे जे घेऊन हे शरीर निर्माण झालेले असते, त्याचे त्याला परत (निसर्गाला,ब्रह्मांडाला परत ) देऊन साधू-संत नि-र्देही होतात. म्हणजेच समाधीच्या जागी काहीही शिल्लक रहात नाही. त्या ठिकाणी शिल्लक राहते ते म्हणजे चैतन्य, ऊर्जा, स्पंदने.
संजीवन समाधीचे एक वैशिष्ट्य असे आहे की, अशा साधू , संतांना पंचमहाभूतांतून हे सगळे पुन्हा गोळा करून आपले शरीर परत धारण करता येते. ( महावतार बाबाजी सुद्धा ह्या क्रिया करू शकतात. )
आजही ज्यांनी साधनेची एक विशिष्ट पातळी गाठलेली आहे अशा व्यक्ती किंवा साधक जेव्हा आळंदीला ज्ञानेश्वर माउलींसमोर डोळे मिटून ध्यान लावतात तेव्हा अशा उपासकाला,साधकाला ओंकाराचा अनुभव देऊन आपल्या अस्तित्वाचा मायेचा स्पर्श माउली करून देतात. ( म्हणजेच साधकाला ओंकार ऐकू येतो )
.
.
.
.
--- अल्लख निरंजन 🙏🙏 मेरी भक्ति, गुरु की शक्ति 🙏🙏
[15/04, 12:46 pm] Vithaldas Modagekar: 🏵🌻🌺🙏🏼🌺🌻🏵
१. दत्त या देवतेकडून जिवाला अधिक प्रमाणात सात्त्विक शक्ती मिळत असल्याने त्याच्या आधारे जीव वाईट शक्तींशी लढू शकतो.
२. दत्ताच्या नामजपामुळे जिवाला शिवाचीही शक्ती मिळते.
३. दररोज किमान १५ ते २० मिनिटे एकाग्र चित्ताने दत्ताचा नामजप केल्यास वाईट शक्तींचा त्रास अल्प होतो.
४. पूर्वजांना गती मिळते आणि त्यामुळे घरातील वातावरण आनंदी रहाण्यास साहाय्य होते.
*लिंगदेहाला गती देण्याच्या संदर्भात दत्ताच्या नामजपाचे होणारे फायदे*
१. पूर्वजांना गती देणारी देवता दत्त आहे. दत्ताचा नामजप केल्याने नामजपातून प्रक्षेपित होणार्या आघातजन्य तेजोमय लहरींमुळे लिंगदेहाभोवती असलेल्या वासनात्मक लहरींची कार्य करण्याची तीव्रता अल्प होऊन त्यातील रज-तम नष्ट होऊ लागल्याने लिंगदेहाचे जडत्व अल्प होऊन त्याला पुढे जाण्यास ऊर्जात्मक बळ मिळते.
२. लिंगदेह आणि त्याच्या प्रत्यक्ष देहाभोवती संरक्षककवच निर्माण होते. यामुळे त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते.
३. पृथ्वीवरील वासनात्मक आसक्तीही अल्प होण्यास साहाय्य झाल्याने त्याला अल्प वेळात पृथ्वीमंडल भेदून पुढे जाता येणे शक्य होते.
४. दत्ताचा नामजप केल्याने वायूमंडलात चैतन्य कणांची निर्मिती होऊन त्याचा लिंगदेहाला फायदा होतोच.
५. नामजप करणार्या इतर जिवांचेही दूषित झालेल्या वायूमंडलातील त्रासदायक लहरींपासून रक्षण होते.
*पूर्वजांच्या त्रासांच्या निवारणार्थ दत्तोपासना*
दत्त म्हणजे ब्रम्हा, विष्णु, महेश यांच्या सगुण रुपांचे प्रत्यक्ष एकत्व!
विवाह न होणे, विवाह झाल्यास पती-पत्नींचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, अपत्ये बालपणातच मृत्यूमुखी पडणे वगैरे त्रास असलेले समाजात आपल्याला दिसतात. या गोष्टी पूर्वजांच्या त्रासामुळे होतात. दारिद्र्य, शारीरिक आजार यामागेही पूर्वजांचे त्रास असू शकतात. मात्र आपल्याला पूर्वजांचा त्रास आहे किंवा नाही, हे केवळ उन्नतच सांगू शकतात.
हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्धपक्ष वगैरे करत नाहीत. तसेच साधनाही करत नाहीत. त्यामुळे बहुतेकांना पूर्वजांच्या लिंगदेहामुळे त्रास होतो. मात्र तो त्रास आहे किंवा नाही, हे सांगणारे उन्नत न भेटल्यास येथे दिलेले काही तर्हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात, असे समजून साधना करावी.
*समंधबाधा दूर होण्यासाठी दत्तोपासना*
समंधबाधांना (वेगवेगळया पद्धतीने किंवा मार्गाने आत्महत्या करणार्यांना) ब्रह्मांडातील कोणतीच गती प्राप्त होत नसल्याने (कोणत्याही योनीची प्राप्ती होत नसल्याने) त्यांना पाताळवास प्राप्त होतो. पाताळवासात पोहोचण्यापूर्वी त्याच्या कर्मगतीचा प्रवास त्याला भुवलोकात राहून पूर्ण करावा लागतो, उदा. जसे हलक्या वजनाच्या थोड्या बिया (मिरची, तुळस, सब्जा वगैरे) किंवा थोडे वाळूचे बारीक कण भरून फुगवून हवेत सोडलेला फुगा आतील बियांसहित किंवा वाळूच्या कणांसहित हवेत तरंगतो.
त्याची शक्ती क्षीण होऊन तो फुटल्यानंतर त्यातील बिया आणि कण यांसहित फुग्याचे जे व्रतडे हवेत वर तरंगत होते किंवा विहार करत होते ते आतील दाण्यांसहित खाली येते. याप्रकारेच भुवलोकातील कर्मगती संपल्यानंतर उरलेले तम (कातडे) त्याच्या तमाच्या वजनानुसार त्याला प्राप्त झालेल्या लोकात स्थीर होते. मात्र प्राप्त कर्मगती असेपर्यंत भुवलोकातील समंधबाधा इतर वाईट शक्तींच्या आश्रयाने आपल्या नातेवाइकांना प्रचंड प्रमाणात त्रास देत राहतात. अशा प्रकारे समंधबाधांमुळे साधकांना साधना करण्यात प्रचंड अडथळे निर्माण होतात. दत्ताच्या नित्य उपासनेने अशा समंधबाधांना कर्मगती संपेपर्यंत दत्तमहाराज आपल्यातील योगसामर्थ्याने सातत्याने आपल्या ताब्यात ठेवून साधनामार्गातील अडथळे दूर करतात.
*श्री गुरूदेव दत्त*
[21/04, 4:16 pm] Vithaldas Modagekar: हनुमान चाळीसा साधना आणि सिद्धी भाग २
पिकेटरोड चा मारुती....
लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि. १९.०४.२०१९
©Ankush S. Navghare ®२०१९
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
नमस्कार मित्रांनो, आज हनुमान जन्मोत्सव म्हणजे हनुमानाचा जन्मदिवस असल्याने ह्या दिवशी हनुमान सेवेचा किंवा व्रताचा संकल्प घेणे हे खूप शुभ मानले गेलेले आहे. ह्या दिवशी पासून हनुमान चाळीसा किंवा भीमरूपी स्तोत्र वाचनाचा संकल्प घेऊन ते रोज विशिष्ट वेळा दररोज म्हटल्याने जपसंख्या १५००० झाल्यावर सिद्ध होत असते. ह्या सिद्धीच्या साहाय्याने भारलेली विभूती पाण्यातून पिण्यासाठी देऊन तुम्हीही तुमच्या स्वतःच्या किंवा आप्त स्वकीयांच्या अडचणी दूर करू शकता. हा दिवस त्याच्यासाठी खूप पवित्र आणि सिद्ध मानला गेलेला आहे.
काही दिवसांपूर्वी मी ह्या लेखाचा पहिला भाग लिहिला होता, त्यात १०० वेळा हनुमान चाळीसा वाचल्याने कशी एक व्यक्तीला कित्येक महिन्यांपासून रखडलेली अटकपूर्व जामिन मिळून त्याची जामिनावर सुटका झाली ह्यासंबंधी अनुभव कथन केला होता, आणि त्याला तुम्ही सर्वांनी खूपच चांगला प्रतिसाद दिलात, काही जणांनी कॉल करून अजून माहिती जाणून घेण्याची विनंती केली. त्या सर्वांच्या विनंतिला मान देऊन मी हा पुढचा भाग लिहिण्याचा विचार करीत होतो, परंतु मला यश येत नव्हते परंतु कालच मला हा भाग लिहिण्याची आज्ञा झाली आणि म्हणून आज मी हा भाग तुमच्या समक्ष ठेऊ शकत आहे. ह्या भागात हनुमान चाळीसा मधील काही महत्वपूर्ण दोह्यांचा मंत्र म्हणून उपयोग करून कुठले फळ प्राप्त करून घेता येते ह्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
नासे रोग हरे सब पिरा। जपत निरंतर हनुमत बिरा।।
संकट ते हनुमान छुडावे। मन क्रम बचन ध्यान जो लावे।।
वरील ओळी त्याच सुप्रसिद्ध हनुमान चाळीसातील आहेत, ज्यात तुलसीदास महाराजांनी हनुमान महाराजांकडून वचन घेऊन ते आपल्याला दिले आहे की, जी व्यक्ती सतत हनुमान चाळीसा चा पाठ करेल त्याच्या सर्व रोगांचा नाश होईल, तसेच मन, क्रम (संकल्पात म्हटल्याप्रमाणे) आणि ध्यानपूर्वक जो हनुमान चाळीसा चे पाठ करेल त्याची सर्व संकटे बजरंगबली हरण करतील आणि त्याची मुक्तता करतील.
ह्या लेखाचा पहिला भाग लिहायला घेतला होता तेव्हा बरेच दिवसंपासून माझे वडील हॉस्पिटल ला ऍडमिट होते, दुर्दैवाने आता ते आमच्यात नाहीत,. त्यावेळी मी त्यांच्या आरोग्यासाठी काही देवतांच्या प्रार्थना करीत होतो, त्यात मारुतीरायांचाही समावेश होता, त्यावेळी माझी एक मैत्रीण मला म्हणाली होती की तू पिकेटरोड च्या इकडे असलेल्या मारुतीचे दर्शन घे, तो मारुती खूपच जागृत आहे, तुझ्या वडिलांसाठी प्रार्थना कर, त्यांना लगेच बरे वाटेल. मीही तिला होकार दिला होता पण कालांतराने ती गोष्ट विसरूनच गेलो होतो. त्यानंतर हॉस्पिटल मध्ये बसून ह्या लेखाचा पहिला भाग लिहून काढला होता. वडिलांना परत हॉस्पिटल मधून घरी पाठवले होते, आणि दोनच दिवसांनी परत ऍडमिट करणार होते. मधल्या काळात मी हनुमान चाळीसा चे अनुष्ठान करीत होतो, परंतु मैत्रिणीने सांगितल्या प्रमाणे पिकेटरोड च्या मारुतीयाराचे दर्शन घ्यायचे साफ विसरलो होतो. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे वडिलांना ऍडमिट केल्या नंतर आणि ह्या लेखाचा पहिला भाग पोस्ट केल्यानंतर मला अजून एक व्यक्तीने अचानक कॉल करून कसे काय माहीत नाही परंतु पिकेट रोड च्या मारुतीचे दर्शन घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी मी विचारात पडलो होतो की त्यांनी मला पिकेट रोडच्या मारुतीचे दर्शन घे असेच का सांगितले होते की मग मारुती रायानेच तर मला परत एकदा मला त्यांची भेट घ्यायची आठवण तर करून दिली नव्हती ना, परंतु मी शेवट पर्यंत मला तिकडे जाता आले नाही म्हणून मी मनानेच मारुतीरायला नमस्कार करून माझ्या पापांचा सांभाळ करायला सांगितले. माझ्या पापांचे ओपेरेशन व्यवस्थित झाले आणि अगदीच वेळेवर झाले, ह्या वेळी काही असे काही चमत्कार घडले की त्याला काहीच कारणमीमांसा देता येत नाही. ऑपरेशन साठी लागणाऱ्या रक्ताची सोय विनासायास झाली, मदत करायला माणसे उभी राहिली इत्यादी. सांगायचे तात्पर्य असे की संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम बचन ध्यान जो लावे, ह्या दोह्या प्रमाणे मन, क्रम आणि वचन ह्यांनी वचनबद्ध होऊन मारुतीरायचे ध्यान केले तर हनुमानजी तुमची संकटे दूर केल्याशिवाय राहत नाहीत. ह्याच प्रमाणे खालील इतर काही दोहे विशिष्ट प्रकारच्या संकटांसाठी उपयोगी आहेत. ह्या दोह्यांचा मंत्रासारखा उपयोग करण्याची विधी म्हणजे
सुरवातीला १ वेळा हनुमान चाळीसा चा पाठ करून मग १०८ वेळा संबधीत दोह्याचा जाप करून परत एकदा हनुमान चाळीसा चा जाप करावा.
१. भीम रूप धरी असुर संहारे, राम चंद्रजीके काज सवारे।:-
ह्या दोह्याचा उपयोग त्यावेळी केला जातो ज्यावेळी कितीही प्रयत्न करून तुमचे काम होत नसेल किंवा हाता तोंडाशी आलेला घास निसटत असेल, त्यावेळी मनोभावे रोज १०८ वेळा ह्या दोह्याचा पाठ केला असता, साधारणतः आठ दिवसांत तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. खूप मोठे संकट असेल आणि त्वरित फलप्राप्ती हवी असेल तर शनिवारी आणि मंगळवारी ह्या मंत्राचा जाप हनुमान मंदिरात जाऊन केल्याने त्वरित लाभ होतो.
२. अष्ट सिद्धी नवनिधी के दाता, अस वर दिन जानकी माता :-
ह्या दोह्याचा उपयोग लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होऊन सर्व कामे मार्गी लागण्यासाठी केला ज्यावेळी माता सीतेने हनुमानाला तिच्या गळ्यातला मोत्यांचा कंठा हार दिला, परंतु हनुमानजीनि त्याचा प्रत्येक मोती फोडून त्यात राम आहे का हे पाहण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तसे आढळून न आल्याने त्यांनी तो फेकून दिला. त्यावेळी त्यांचे प्रभूश्रीराम चंद्रांवरील निस्सीम प्रेमासाठी त्यांनी संपत्तीलाही महत्व दिले नाही हे पाहुन माता सीता ह्यांनी हनुमानजीना वरील वरदान दिले. त्या प्रमाणे ह्या दोह्याची विधिवत आणि वर दिल्याप्रमाणे साधना केल्यामुळे आपल्याला अष्टसिद्धी आणि नव निधींची प्राप्ती होऊ शकते.
३. नासे रोग हरे सब पिरा। जपत निरंतर हनुमत बिरा:-
ह्या दोह्याचा उपयोगाने सर्व प्रकारच्या पीडा आणि जुनाट रोगांचा परिहार होऊन, हनुमानजींची कृपादृष्टी साधकावर सतत राहते.
४. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन कुमार।,बल-बुद्धि बिद्या देह मोहिं, हरहु कलेस बिकार।।
जाची स्मरणशक्ती कमकुवत झालेली असेल त्यांनी ह्या दोह्याचा रोज ११ वेळ पाठ केला तरी खूप फायदा होतो. ह्या दोह्याचा अर्थ असा आहे की, हे पवनकुमार मी बुद्धीहीन बालक आहे, माझ्यावर बुद्धीचा वर्षाव करून मला बुद्धिमान बनव. काही विद्यार्थ्यांची तक्रार असते की त्यांना परीक्षेच्या वेळेला किंवा परीक्षा हॉल मध्ये घेल्यावर सर्व विसरायला होते, त्यांनी तिकडे जाण्याआधी ह्या डोह्याचा ११ वेळा पाठ केला तर त्यांची समस्या दूर होऊन चांगले यश मिळू शकते.
५. भूत-पिशाच निकट नहीं आवे। महावीर जब नाम सुनावे।।
ज्याच्या मनात सतत कसली ना कसली भीती असते, किवा ज्याला नेहमी भूत इत्यादींची भीती वाटत असते त्याने ह्या दोह्याचा जाप केला असता त्याच्या अखिल भितींचे हरण होऊन हनुमानजी स्वतः त्याच्या राक्षणास तत्पर राहतात.
६. विद्यावान गुनी अति चातुर। रामकाज करिबे को आतुर।।
ज्या व्यक्तीला विद्या आणि धन ह्या दोघांचीही लालसा आहे त्यांनी ह्या दोह्याचा सतत जाप केला पाहिजे.
७. 'सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना।'
हा दोहा सतत जपल्याने २१ दिवसानंतर तुमच्या आसपास हनुमानजींचे अस्तित्व जाणवू लागते. ते तुमची सतत रक्षा करतात आणि तुमच्यावर सदा प्रसन्न राहतात. तुम्हीही ह्या प्रकारची साधना करून आपले जीवन सुखी करून घ्या.
[21/04, 4:24 pm] Vithaldas Modagekar: दैवी संपदा लाभलेली झाडे....
लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
पुनः प्रकाशन:- दि.१६.११.२०१८
©Ankush S. Navghare ®२०१८

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला काही अशा झाडांबद्दल (झाडांपासून मिळणाऱ्या फळे, फुले, मूळ) माहिती सांगणार आहे ती घरात किंवा घरासमोर लावली असता किंवा त्या पासून मिळणाऱ्या वस्तू घरात ठेवल्या असता घरात कुठल्याही अशुभ शक्तींचा किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश सहजासहजी होत नाही किंवा अजिबातच होत नाही. तसेच ह्या झाडांच्या नुसत्या सानिध्याने आपले रक्षण होते किंवा त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे आपले काही आजारही बरे होऊ शकतात.
१. तुळस:- आपल्या देशात तुळस ह्या झाडाला खूपच पवित्र मानले जाते आणि रोज त्याची पूजा केली जाते. एखाद्या घरात तुळस नाही असे कुठेच दिसून येत नाही. तुळशीची पाने भगवान श्री विष्णूंना खूप प्रिय आहेत. ज्या घराच्या दारासमोर किंवा घरात ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावलेले असते त्या घरात कधीच अशुभ किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, किंवा करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात तुळस लावावी असे प्राचीन शास्त्रात पण लिहिले आहे. असे म्हणतात की ज्या ठिकाणी तुळस लावली जात नाही तिथे आशा शक्ती सहज प्रवेश करू शकतात आणि मग त्याच्या प्रभावाने घरात आजार, भांडणे इत्यादी आणू शकतात. मी काही घरी अशी पहिली आहेत की तिथे तुळस अजिबात जगत नाही अशा ठिकाणी जमिनीत किंवा वास्तूत नक्कीच काहीतरी दोष असतोच असतो. घरात वास्तू दोष आहे की नाही किंवा घरात काही अशुभ आहे की नाही हे पाहण्याकरिता घरात तुळस लावावी. ज्या घरात तुळस चांगली वाढत असेल तिथे सर्व मंगल असते.
२. लाजाळू:- लाजाळू चे रोप हे शक्यतो शेतात किंवा शेताच्या बांधावर उगवते किंवा क्वचितच रस्त्याच्या कडेला उगवलेले दिसते. लाजाळू च्या पानांना हात लावला असता ती पाने मिटायला सुरवात होते म्हणूनच तिला लाजाळू असे गमतीने म्हटले जाते. त्यात वरून खाली मिटणारी पाने आणि खालून वर मिटणारी पाने असा प्रकार असतो आणि त्यावरूनच लाजळूचे महत्व कमीजास्त होत असते. हे सर्व असले तरी लाजाळू च्या झाडात प्रचंड दैवी शक्ती आहे. ज्या घरात लाजळूचे झाड असते तेथे कधीच अशुभ शक्ती प्रवेश करू शकत नाहीत तसेच घराला सुब्बत्ता येते. ज्यांचे सहजासहजी ध्यान लागत नाही त्यांनी लाजळूची काही पाने आपल्या असनाखाली ठेऊन ध्यान केले असता ते जलद लागू शकते किंवा गाढ लागू शकते. लक्ष्मी प्राप्तीसाठी लाजळूची पाने तिजोरीत ठेवावीत.
३. बेल:- भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असल्याने बेलाची पाने खूपच प्रसिद्ध आहेत. बेल हा एक खूप मोठा वाढणारा वृक्ष आहे तरीही सुरवातीच्या काळात त्याचे रोप तुम्ही कुंडीत लावू शकता. ज्योतिष शास्त्रानुसार बेलाच्या झाडाची सेवा केल्यामुळे भगवान श्री शंकराची सेवा घडत असते आणि त्यांचे सर्व भूत, प्रेत, गण, अशुभ शक्ती ह्यांच्यावर अधिपती असल्याने त्या शक्तींचे कारक ग्रह, राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावामुळे आपण वाचू शकतो. राहू आणि केतू ह्याच ग्रहांच्या पत्रिकेतील स्थितीवरून आपल्यावर बाहेरची बाधा होऊ शकते की नाही हे कळू शकते. परंतु, जर घरात बेलाचे झाड लावले आणि रोज त्याची सेवा केली तर राहू आणि केतू ह्या ग्रहांची सेवा घडून त्यापासून होणाऱ्या संभाव्य बाधा टळू शकतात. हे झाड शक्यतो आग्नेय दिशेला लावलेले चांगले असते. बेलाच्या फळाच्या गराचे सरबत पोटदुखी, मुरडा इत्यादींवर खूप गुणकारी असते. बेलाची पाने चावून खाल्ल्याने दात बळकट होतात तसेच दाताला एक प्रकारचे तेज प्राप्त होऊन बोलताना लोकांवर त्याचा संमोहनासारखा प्रभाव पडून तुमची पैशाची कामे जलदगतीने होऊ शकतात. एक गुप्त प्रयोग असा आहे की बेलाच्या पणाला एक ४×४ आकाराच्या पांढऱ्या कागदावर मध्यभागी चिकटऊन त्यावर त्राटक केले असता तुमच्यावर होणारे करणी प्रयोग समोरच्यावरच उलटतात. सर्वांनी असा गुणकारी वृक्ष लावून स्वतःचे जीवन सुखी करून घेणे.
४. ब्राम्हकमळ:- ब्राम्हकामळाचे झाड खुपच पवित्र मानले जाते. जेथे ब्रम्हकमळाचे झाड लावले जाते ती जागा खूप पवित्र असावी लागते अन्यथा त्याला फुले येत नाहीत व त्याची वाढ होत नाही. घरात वास्तुदोष किंवा काही अशुभ शक्तींचा वावर आहे की नाही हे पाहण्यासाठी ह्या झाडाचा उपयोग होऊ शकतो. जर घरात काही दोष किंवा तसेच काही असेल तर ह्याची पाने काळी पडू लागतात किंवा खराब होऊ शकतात. ज्या दिवसापासून तुमच्या घरातील ब्राम्हकमळाच्या झाडाची पाने खराब होऊ लागतील तेव्हा निश्चितच घरात काहीतरी समस्या निर्माण झाली आहे असे समजावे.
५. रुद्राक्ष:- रुद्राक्ष तर सर्वांना माहीत आहेच. रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान श्री शंकरांच्या अश्रूंतून झाली आहे अशी आख्यायिका आहे. श्री गुरुचरित्रात असे म्हटले आहे की एक सहस्त्र रुद्राक्ष धारण करणारा मनुष्य साक्षात शिवासमान असतो. रुद्राक्षचे एकूण २१ प्रकार असतात. त्यांच्यावर असणारी रेष हे त्यांचे वेगळे पण स्पष्ट करते. त्यात १ मुखी आणि २१ मुखी रुद्राक्ष हे खूपच प्रभावी मानले जातात परंतु ते मिळण्यासाठी खूपच भाग्य लागते किंवा पैसे लागतात. सध्या बाजारात मिळणाऱ्या रुद्राक्षांपैकी ५ मुख असणारे रुद्राक्ष हे खरे असून बाकी सर्व नकली मिळत असतात. ५ मुखी रुद्राक्ष हे सहज उपलब्द्ध होतात. गळ्यात रुद्राक्ष धारण करणाऱ्याच्या मागे कुठलीही वाईट शक्ती लागत नाही. अशुभ शक्ती आशा माणसापासून लांब राहते. म्हणूंन प्रत्येकाने किमान एक रुद्राक्ष तरी धारण करावा. रुद्राक्ष हृदयाच्या इथे धारण केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो तसेच रुद्राक्ष पाण्यात भिजत घालून ते पाणी सकाळी अनाशे पोटी प्यायल्याने तुमचे निद्रानाश, इत्यादि मानसिक आजार बरे होऊ शकतात.
६. कोरफड:- ह्या झाडाला इंग्रजीमध्ये alovera असे म्हटले जाते. कोरफळीत नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती आहे. कोणाला नजर लागली असता त्याच्यावरून कोरफड ७ वेळा उतरवून कचऱ्यात टाकली असता नजरदोष जातो, त्यासाठी वेगळ्या मंत्राची आवश्यकता नसते. कोरफळीच्या झाडाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते त्यामुळे ते झाड हवेवर पण खूप दिवस जगू शकते म्हणून कोरफळीचे लहानसे रोप तुम्ही घराच्या दाराच्या चौकटीला वरच्या भागाला बांधले तर घरात अशुभ शक्ती प्रवेश करू शकत नाहीत. कोरफळ लक्ष्मीप्राप्तीच्या कामात पण उपयोगी पडू शकते.
७. कोहळा:- कोहळा ही भोपळ्यासारखी दिसणारी एक वनस्पती आहे. कोहळ्या मध्ये तीव्र प्रकारच्या नारारात्मक शक्ती, नजर आणि अशुभ शक्ती खेचून घेण्याची शक्ती असते. कोकणासारख्या गावांमध्ये तुम्हाला घरोघरी कोहळे बांधलेले आढळून येतील. कोहळा घरात पण बांधता येतो. ज्यावेळी नजरेचे प्रमाण वाढते त्यावेळी कोहळ्यातून पाणी ठिबकू लागते अशावेळी त्या कोहळ्याचे विसर्जन करून त्याजागी नवीन कोहळा बांधावा. अशाप्रकारे बदललेल्या कोहळ्यातून जेव्हा पाणी ठिबकायचे बंद होईल तेव्हा घरातल नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे गेली असे समजावे.
८. लिंबू:- लिंबाबद्दल तर सर्वानाच माहीत आहे. सर्व प्रकारच्या तांत्रिक आणि मांत्रिक कामात लिंबाचा आवर्जून वापर होत असतो करण लिंबामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा खेचण्याची ताकद आहे. असे म्हणतात की तंत्रात १००० बोकडांचा बळी हा १ रेड्याच्या बळी सारखा असतो, १००० रेड्यांचा बळी हा १ माणसाच्या बळी सारखा असतो आणि १००० माणसांचा बळी हा एक लिंबू कापण्यासारखा असतो. म्हणूंन कुठल्याही प्राण्यांचा बळी देण्यापेक्षा एक लिंबू कापणे हे जास्त प्रभावी मानले जाते. लिंबाचे झाड घरात किंवा घराच्या आवारात लावणे खूप शुभ मानले गेलेले आहे. लिंबाचा एक टोटका असा आहे की, एक लिंबू घेऊन तो काचेच्या ग्लास मध्ये पाण्यात बुडता ठेऊन तो ग्लास घरात सर्वाना दिसेल असा ठेवल्याने घरात येणाऱ्या सर्वांच्या वाईट नजरा तो शोषून घेतो आणि त्यापासून घरच्यांची सुरक्षा करतो. तो लिंबू खराब झाल्यावर त्याजागी नवीन लिंबू ठेवावा.
९. काळी हळद:- हळदीचे काही प्रकार आहेत त्यात काळी हळद हा एक प्रकार आहे. मार्केट मध्ये काळ्या हळदीच्या नावाने काहीपण दिले जाते आणि पैशे उकळले जातात त्यापासून लांब राहणे. काळी हळद वशीकरण, कोर्ट केसेस मध्ये विजय, राजकारण मध्ये विजय, भूत बाधेपासून सुटका करून घेण्यासाठी तसेच लक्ष्मी प्राप्ती साठी उपयोगात आणली जाते. हळदीचे ७ प्रकार आहेत त्यात एक प्रकार काळी हळद म्हणून प्रचलित आहे.
हळदीचे ७ प्रकार....
१. पांढरी हळद... ही आतून पांढऱ्या रंगाची असते आणि इतर हळदीच्या जोडीला ही वापरतात.
२. जांभळी... हीचे मूळ आतून जांभळे असते आणि पानावर जांभळा पट्टा म्हणजे रेष आलेली असते.
३. कुकवी... ही कुंकवासारखी लालसर असते. हिची ओळख म्हणजे हिच्या मुळाने कागदावर रेष मारली असता लाल रेष उमटते. हि खूप शक्तिशाली मानली जाते. हि धनप्राप्ती साठी पण वापरली जाते.
४. पिवळी... हि आतून पिवळी असते. हि वाशिकरणासाठी वापरली जाते.
५. शेंदरी... हि आतून शेंदरा सारखी असते. हि पतिपत्नी मध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी वापरता येऊ शकते.
६. काळी.. हि सर्वात शक्तिशाली हळद असते. हि खूपच दुर्लभ असून खूप खोल जंगलातच मिळू शकते. हिचे ५० ते १०० ग्राम वजनाचे मूळ ५० लाखाच्या आसपास जाऊ शकते. आणि ज्याच्या नशिबात असेल त्यालाच ती मिळू शकते. हिच्या आसपास रक्षण करण्यासाठी/ किंवा विशिष्ट वासामुळे कोब्रा नाग असतात. हिची ओळख पटवणे आणि हिला काढणे ह्याचे काही प्रकार आहेत ते मी नंतर कधीतरी सांगेन.
७. साधी हळद... हि जेवणात वापरली जाते.
काळी हळद हि एक प्रकारची संजीवनी बुटी सारखी असते ज्यात दैवी गुण समावण्याची शक्ती आहे. बहुतेक सर्व संजीवन बुटी ह्या हिमालयात मिळतात. मग प्रश्न असा पडतो की महाराष्ट्रात काळी हळद कशी आली किंवा काही औषधी वनस्पती कशा आल्या तर त्याची एक आख्यायिका जी मी काही जाणकारांकडून ऐकली आहे ती शेयर करत आहे.
....ज्यांनी कोणी रामायण पाहिल वाचलं असेल त्यांना हे माहीतच असेल की ज्यावेळी श्री राम आणि लक्ष्मण वर रावणाचा मुलगा इंद्रजित एक शक्ती प्रयोग करतो त्यावेळी ते दोघेही बेशुद्ध होतात. त्यावेळी श्री हनुमान रावणाच्या वैद्या ला उचलून घेऊन येतात. तेव्हा रावणाचा वैद्य सांगतो की ह्यांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला संजीवन बुटी ची आवश्यकता आहे आणि ती फक्त हिमालयात द्रोणागिरी पर्वतावर उपलब्ध आहे. हे ऐकून श्री हनुमान द्रोणागिरी पर्वतावर जातात परंतु त्यांना तिकडे नक्की संजीवनी बुटी कुठली ह्याची ओळख पटत नाही म्हणून ते पूर्ण पर्वतच उचलून आणतात. तो पर्वत आणत असताना श्री रामाचे भाऊ भरत त्यांना बाण मारतात आणि त्यामुळे तो पर्वत आणि ते दोघेही खाली पडतात अशी आख्यायिका आहे.
....तो पर्वत आणत असताना त्या पर्वताचा काही भाग तुटून खाली पडतो तो भाग म्हणजे आत्ताच नाशिक बाजूचा सप्तश्रुंगी देवीच्या गडावरील वणी या क्षेत्राचा डोंगर. त्याचप्रमाणे वसई येथील तुंगारेश्वर चा डोंगर आणि पालघर येथील काळदुर्ग तसेच इतर काही डोंगरांवर थोड्याफार प्रमाणात त्या संजीवनी बुटी पडल्या आणि त्यांची वाढ होत राहिली. त्यापैकी वणी चा डोंगर खूपच सिद्ध आहे आणि तिथे खूपच जाडीबुटी आहेत.
काळ्या हळदीचा उपयोग कसा करून घ्यावा...
१. काळ्या हळदीचे रोप असलेली कुंडी तुमच्या ऑफिस मध्ये किंवा दुकानाच्या दरवाजा बाहेर ठेवली असता व्यवसायात कमालीची वाढ होते. आमच्या येथे मी तुम्हाला अशी कित्येक दुकाने दाखवू शकतो त्याच्यासमोर अशा कुंड्या ठेवल्या आहेत.
२. घराच्या बागेत ह्याची रोपे लावल्याने घरात समृद्धी येते. काळ्या हळदीच्या पानाचा रस प्यायल्याने ३ दिवस पर्यंत तहान भूक लागत नाही. त्यामुळे साधू इत्यादी त्याचा उपयोग करताना आढळतात.
३. काळ्या किंवा इतर हळदीचा जरासा नखाएवढा तुकडा तोंडात ठेऊन तुम्ही ज्याच्याशी बोलता तो तुमच्यावर मोहित होतो आणि तुमची शासकीय किंवा इतर काही कामे सहजपणे होऊ शकतात. तसेच पैशाची कामे किंवा कोणाला कर्जाऊ दिलेली रक्कम सहजपणे परत मिळू शकते.
४. रोज काळ्या हळदीचे किंवा इतर त्याच प्रकारातील हळदीचे सेवन केल्याने माणसाच्या बोलण्यात एक प्रकारची वाचा शक्ती निर्माण होते.
५. हळदीचे पान असनाखाली ठेऊन ध्यान केले असता ते पटकन लागते कारण ह्या प्रकारच्या झाडांमध्ये विचार संक्रमाणाची आणि विचार ग्रहणाची जबरदस्त शक्ती असते. ज्या प्रमाणे व्याघ्रसनावर बसून माणसाचे सहज ध्यान केंद्रीत होते त्याच प्रमाणे ह्याच्या पानांचा उपयोग असनाखाली केला असता सहज योग प्राप्त होऊ शकतो.
६. अशा प्रकारच्या हळदीचा एक गोल तुकडा कापून त्यावर त्राटाक केले असता तुमच्या वर केले गेलेले करणी प्रयोग (Phychic Attack) त्या माणसावरच उलटू शकतात.
७. रोज ह्या प्रकारच्या हळदीची मनोभावे पूजा करून तिला तुळशी प्रमाणेच धूप दीप दाखवल्याने आपल्या मनोकामना ६ महिने ते १ वर्षांत पूर्ण झाल्याचे कित्येक लोकांचे अनुभव आहेत.
८. काळ्या हळदीचे किंवा त्याच प्रकारच्या इतर हळदीचे लहान तुकडे किंवा छोटी रोपे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात परंतु दक्षिण दिशा सोडून लावले असता त्या त्या दिशेचा वास्तुदोष जातो. जसे नैवृत्त कोपऱ्यात लावले असता घरात एकोपा निर्माण होतो व घरातलयांशी संबंध सुधारतात. दारासमोर लावले असता अशुभ शक्ती घरात शिरत नाहीत, इत्यादी.
१०. नारळ:-
.....नारळ माहिती नाही असा एकही माणूस ह्या जगात मिळणार नाही, परंतु आपल्या देशात नारळाला खूपच महत्व प्राप्त झालेले आहे. नारळाला माणसासारखे मानले जाते करण नारळाला २ डोळे आणि एक शेंडी असल्याने नारळाला ब्राम्हण मानले जाते आणि कुठल्याही सात्विक पूजा कार्यात नारळाची स्थापना केली जाते. कुठलेही पूजा, कर्म, श्राद्ध किंवा कुठलेही कार्य नारळाशिवाय पूर्णच नाही होऊ शकत. अशा ह्या नारळात एखादी वाईट किंवा अशुभ शक्ती अडविण्याची प्रचंड ताकद आहे. तुम्ही घरोघरी पाहिले असेल की देव्हाऱ्यात कर्यावर म्हा आहे तांब्याच्या तांब्यावर नारळ ठेवलेला असतो आणि त्याखाली पाणी ठेवलेले असते किंवा कित्येकांच्या घराच्या आढयाला लाल किंवा पिवळ्या कपड्यांत नारळ टांगलेला असतो तर ते का. त्या मागे एक शास्त्रीय कारणही आहे ते म्हणजे आकाश तत्व. इतर कुठलेही फळ, कुठलीही गोष्ट सोडलीत तर फक्त नारळातच पंचमहाभूतांतील सर्वच तत्व सम प्रमाणात एकटवली गेलेली आहेत. त्यात आकाश तत्व हे जास्त प्रमाणात आहे. अगदी मानवी शरीरापेक्षाही जास्त आकाश तत्व नारळात एकटवलेले आहे आणि सृष्टी च्या नियमाप्रमाणे कुठलीही शक्ती ही नाशानंतर आकाषश तत्वाकडेच खेचली जाते. जसे मनुष्याचा आत्मा देहाच्या मृत्यूनंतर सुर्यलोकत म्हणजे आकाशातच जात असतो. ह्याच कारणांमुळे ह्या जगातील सर्वच शुभ, अशुभ आणि नकारात्मक शक्तीही नारळाकडेच सहजरित्या आकर्षित होत असतात आणि म्हणून कुठलीही शक्ती घरात पासरण्या आधी ती नारळात खेचली जाऊन आकाशाकडे परावर्तित केली जाते किंवा आतल्या जलतत्वा मध्ये विलीन केली जाते. कुठलाही उतारा किंवा अस्थींचे विसर्जन जलात करतात कारण फक्त जल तत्वातच त्याचे विघटन करण्याची शक्ती आहे आणि ती नारळामध्ये निसर्गतः आहे. तुम्ही पाहिले असेलच की देवाला नारळ अर्पण करताना त्याची शेंडीकडची बाजू देवाकडे ठेऊन मग तो फोडून प्रसाद म्हणून दिला जातो कारण त्या शेंडीतूनच कुठलीही शक्ती नारळात खेचली जाऊन त्यात कैद होत असते. तशीच ईश्वरी शक्ती त्यात खेचली जाऊन त्यातील पाण्यात विरघळते आणि म्हणूनच ते पाणी तीर्थ म्हणून आणि खोबर प्रसाद म्हणूंन वाटला जातो. नारळाला देवघरात कर्यावर ठेवण्याचे कारण म्हणजे तुम्ही हे ऐकलेच असेल की कोणावर ही करणी करण्या आधी त्याच्या देवांना बंधन आणले जाते, त्याचप्रमाणे कुठलीही अशुभ शक्ती आधी आपल्या देवावर किंवा कुलदैवतावर हल्ला करते आणि त्याला निष्प्रभ करून आपल्याला मिळणारे देवांचे सहाय कमी करते त्यानंतर मग ती शक्ती आपल्या घरावर हल्ला करते परंतु नारळाच्या अस्तित्वामुळे ती त्याच्यात खेचली जाऊन आपल्या देवाना त्याची झळ पोहोचत नाही आणि आपलेही रक्षण होते. कर्यात पाणी ठेवण्यामागचे कारण म्हणजे कधी कधी नारळ सुकलेला असू शकतो किंवा खराब झालेला असू शकतो तेव्हा हीच शक्ती कार्यतील पाण्यात उतरते आणि आपले रक्षण होते.
असा हा दैवी संपदा लाभलेला नारळ सर्वांनी आपल्या घरातील देव्हाऱ्यात किंवा देव्हारा ईशान्य भागात नसेल तर ईशान्य कोपऱ्यात ठेऊन आपले आणि आपल्या घराचे रक्षण करावे ह्याबाबत मी स्वतः अनुभवलेला प्रसंग असा आहे की, माझ्याकडे एक केस आली होती की एक माणसावर कदाचित करणी प्रयोग झाला असावा, त्या माणसाला अचानक सतत रक्ताच्या आणि पाण्याच्या उलट्या सुरू झाल्या होत्या, त्या लोकांना ह्या सर्वांवर विश्वास नसल्याने त्याच्या नातेवाईकानी त्या माणसाला हॉस्पिटल ला ऍडमिट केले होते परंतु नक्की काय झालंय ह्याचे निदान न झाल्यामुळे केस खूपच सिरीयस झाल्याने डॉक्टरांनी त्यांचे हात वर केले होते व त्याला घरी घेऊन जाण्यास संगीतले होते पण सोबत एक चांगला डॉक्टर दिला होता. शेवटी नाईलाजाने म्हणून त्याच्या नातेवाईकांनी त्याला परत घरी हलवले होते. त्या माणसाच्या नातेवाईकांना कोणीतरी मला भेटण्यास सांगितले होते आणि म्हणून एक शेवटचा प्रयत्न म्हणून ते मला त्यांच्या घरी घेऊन आले होते. मी त्यांच्या घरी जाऊन घराची पाहणी करून त्यांना त्या माणसाच्या डोक्याशेजारी कर्यावर नारळ ठेवायला सांगितला, नारळ ठेवताना त्याच्यावर मी काही मला येत असलेल्या मंत्रांचे प्रोक्षण केले होते व आता काय होईल ह्याची वाट पाहत असताना तो नारळ अचानक फुटला म्हणून आम्ही परत दुसरा नारळ ठेवला तर तोही फुटला, असे करता करता जवळपास ६ नारळ फुटले आणि त्यानंतरचे ३ तडकले, त्यानंतर मात्र नारळ तडकला नाही त्याच वेळी त्या माणसाच्या उलट्या कमी कमी होऊन थांबल्या. म्हणून तिथे असलेल्या डॉक्टर ने परत त्याला तपासले आणि अंबुलन्स बोलावून घेतली आणि परत हॉस्पिटल ला ऍडमिट केले. काही दिवसांनी तो माणूस खणखणीत बरा झाला. म्हणूंन आजच सर्वांनी कर्यावर नारळ ठेऊन आपले जीवन सुखी करून घ्यावे.
आता हे सर्व कसं झाल, त्या नाराळामुळेच झाले असा कुठलाही दावा मी करत नाही परंतु ते सर्व असे होते की नाही हे कृपया वाचकांनीच ठरवायचे आहे.
११. सुपारी:-
....सुपारी ह्या वस्तूला आपल्या जीवनात खूपच महत्व आहे. मला सुपारीचे २ प्रकार माहीत आहेत जे मला उपयोगी आहेत. १ साधी सुपारी किंवा पांढरी सुपारी ही पूजापठात वापरली जाते आणि २ काळी सुपारी ही तंत्र कर्मात वापरली जाते. एखाद्याला सुपारी देणे म्हणजे वचन देणे. जस पूजापाठात सुपारीला महत्व आहे तसेच ते आपल्या आयुष्यात ही आहेच. कुठल्याही कामात सुपारी हा शब्द वापरला जातो. सुपारी दिल्यानंतर खऱ्या कामाला सुरुवात होते. अशा ह्या सुपारीला पूजापाठात पण खूपच महत्व आहे. प्रत्येक कार्यात देवाला मुखशुद्धी करिता सुपारी दिली जाते किंवा एखाद्या देवाची मूर्ती नसेल तर त्या सुपारीवर ही देवाचे आवाहन केले जाते. अशी ही सुपारी घराच्या दारात वचन घेऊन ठेवली असता घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाहीत. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जसे मी मागच्या भागात सांगितले तसे त्या ५ वस्तूंमध्ये सुपारीही ठेवली जाते. एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की कोणीही म्हणजे घरातल्या माणसांपैकी सोडून कोणीही तुम्हला सुपारी खायला दिली तर ती खाऊ नये कारण सुपारीत वाशिकरणाचीही खूप मोठी ताकद असते. सुपारी वाशिकरणाच्या विधीत कोणीही फक्त सुपारी खायला देऊन तुमच्याकडून कुठलेही काम करून घेऊ शकतो तुम्हाला फसवू शकतो. माता आणि भगिनींनी शक्यतो सुपारिपासून लांबच राहावे अन्यथा अनर्थ होऊ शकतो. अशी ही सुपारी तुम्ही तुमच्या आज्ञाचक्राच्या इथे लावून डोळे मिटून एकदम एकाग्रतेने आणि श्रद्धेने जर एखादा विचार त्या सुपारीत प्रोक्षित केला आणि ती सुपारी इच्छित व्यक्तीला खायला दिली तर मंत्राशिवायही तुमचे काम तुम्ही सहजगत्या करून घेऊ शकता, तसेच देवाला एखादा नवस घेताना तो सुपारी ठेऊन घेतला तर लगेच फलदायी ठरू शकतो. गावाकडे सुपारी चिकटवूनच कौल मागितला जातो. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक अकॅशन ला रिअकॅशन ही असतेच म्हणूंन कुठलेही चांगलेवाईट काम करण्याआधी नीट विचार करूनच करा.
१२. नागवेलीचे पान:-
.....नागवेलीचे पान म्हणजेच खायचे पान. सुपारीनंतर नागवेलीची पाने पूजेसाठी वापरली जातात. नागवेलीच्या पानातही वाशिकरणाची खूप मोठी शक्ती असते. असे म्हणतात की कोणी पानाचा विडा आपल्याला खायला दिला तर खाऊ नये कारण पानाच्या विड्यात वशीकरण करण्याची खूप मोठी शक्ती आहे. तुम्ही जर का निरीक्षण करत असाल तर एक लक्षात येईल की नेहमीच घरोघरी फिरणारे विक्रेते काही न काही सुपारी किंवा पान तोंडात चघळत असतात आणि बोलत असतात त्यामुळे आपल्या मनावर एक प्रकारची धुंदी येऊन तो सांगेल त्या किमतीला आपण वस्तू विकत घेतो. परंतु ह्या वाशिकरणाचा परिणाम त्या स्त्रियांवर किंवा पुरुषांवर होऊ शकत नाही जे स्त्री, पुरुष कपाळावर तिलक लावतात किंवा टिकली लावतात. तर असे हे नागवेलीचे पानाचे झाड ही खूपच दैवी असते. भारतीय ज्योतिषशास्त्रा प्रमाणे नागवेलीचे झाड घरात कुंडीत लावले असता बुध ग्रहाची शांती होऊन त्यासंबधातील त्रास कमी होतात. ह्या झाडाची रोज पूजा केल्याने वाकचातुर्य प्राप्त होते. ह्या पानांचे काही तांत्रिक प्रयोग असे आहेत.
१. कुठल्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना २ नागवेलीची पाने सोबत ठेवल्याने कामे व्यवस्तीत पार पाडतात कारण त्यांच्या उग्र वासाने अशुभ शक्ती कामात अडथळा आणत नाहीत.
२. भगवान शंकरांना खायचे पान अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात परंतु ते पान कापलेले इत्यादि नसावे.
३. कोणाला वाईट नजर लागली असता खायच्या पानात ७ गुलाबाची पाने टाकून ते खायला दिले असता सर्व नजरबाधा समाप्त होतात. ह्या पानात इतर वस्तू पैकी फक्त खोबर आणि बडीशेप टाकली तर चालू शकते.
४. शनिवारी ५ पिंपळाची पाने आणि ८ देठ असलेली विड्याची पाने लाल धाग्यात बांधून पूर्व दिशेकडे बांधल्याने व्यवसाय वाढतो. असे कमीतकमी ५ वेळा करणे गरजेचे असते आणि प्रत्येक वेळी जुनी पाने पाण्यात विसर्जन करावी.
५. रविवारी घराबाहेर पडताना खायचे पान सोबत घेऊन निघाल्याने सर्व अडलेली कामे पार पडतात.
मित्रांनो असे हे गुणकारी खायचे पान कित्येक आजारांवर उपयोगी आहे.
१. खायची पाने पाण्यात उकळवून ते पाणी प्यायल्याने कफ आणि खोकला होत नाही.
२. पान खाण्यामुळे पाचनशक्ती वाढते.
३. २ कप पाण्यात ५ खायची पाने उकळवून ते पाणी प्यायल्याने शरीराची दुर्गंध जाते.
४. तोंडातून किंवा हीरड्यांतून रक्त येत असल्यास २ पाने आणि १० ग्राम भीमसेनी कापूर चावून चावून खाल्ल्याने हा त्रास कमी होतो तसेच तोंडाला येणार दुर्गंध निघून जातो.
१३. लवंग:-
.....ज्याप्रमाणे पूजपाठात, तंत्रशास्त्रात लवंगला खूप महत्व आहे तसेच ते आयुर्वेदामध्येही आहे. दातदुखीत लवंग तोंडात धरले असता दात दुखी कमी होते, सुक्या खोकल्यामध्ये लवंग तोंडात धरले असता खोकल्याची उबग कमी होते, घसा खवखवणे कमी होते, १ लवंग टाकून दूध प्यायल्याने कामशक्ती वाढते इत्यादी अनेक औषधी उपयोग लावंगाचे आहेत आणि त्यांची लिस्ट करायला गेले तर एक पुस्तक लिहून होइल. त्याचप्रमाणे लवंगामध्ये असे काही गुप्त आणि दैवी गुण आहेत ज्यांचा वापर करून कोणीही मनुष्य रंकाचा राजा होऊ शकतो, आपले जीवन सफल करून घेऊ शकतो. काळे मीठ घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवल्याने त्याभागातली नकारात्मक ऊर्जा कमी होऊन वास्तुदोष कमी होण्यास मदत होते हे सर्वाना माहीत असेलच परंतु त्यात जर का एक दोन लवंग खोचून ठेवले तर वास्तुदोषच काय अशुभ शक्तीही असेल तर निघून जाते.
१. सकाळच्या आरतीत कापूर सोबत लवंग जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन आपल्या साऱ्या इच्छा पूर्ण होतात.
२. लिंबू मध्ये ४ लवंगा टोचून हनुमान मंदिरात ठेऊन 3 वेळा हनुमान चाळीसा पठाण केल्याने सर्व अडलेली कामे होतात.
३. इंटरव्युला किंवा कुठल्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना ५ लवंग पुडी करून जवळ बाळगले असता अशुभ शक्ती अपल्यापासून लांब जाऊन आपल्याला यशप्राप्ती होऊ शकते.
४. नवरात्री मध्ये देवीला लवंग वाहिल्याने आपली शक्यकोटीतील इच्छा पूर्ण होऊ शकते.
५. घराच्या मुख्य दरवाजासमोर लवंग ठेवल्याने त्याच्या वासाने घरात अशुभ शक्ती प्रवेश करत नाहीत.
६. कोणी तुम्हाला नाहक त्रास देत असेल, तुमची बदनामी करत असेल तर त्याच्या फोटोवर ३ लवंग ठेऊन त्याची पुडी करून त्या पुडीवर एक मोठा दगड ठेवल्याने ती व्यक्ती आपला मित्र बनते किंवा आपला मार्ग बदलते.
.. वरील दिलेल्या माहिती प्रमाणे तुम्ही त्याचा लाभ घ्यावा आणि आपले जीवन सुखकारक करून घ्यावे. तुमच्यापैकी कोणालाही ह्या माहितीपेक्षा अजून काही माहिती असेल तर कृपया मलाही सांगावे आणि माझे ज्ञान वाढवावे ही विनंती.
धन्यवाद...
अंकुश सू. नवघरे..
Desclaimer: सदरची माहिती ही स्वानुभवातून, जाणकारांच्या मार्गदर्शनातून आणि साधकांडून संकलित केली गेलेली आहे ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
[21/04, 4:26 pm] Vithaldas Modagekar: हनुमान चालिसा साधना आणि सिद्धी....
लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि.११.११.२०१८

।।जय हनुमान ग्यान गुन सागर
जय कपीस तीहू लोक उजागर।
राम दूत अतुलीत बल धामा
अंजनी पुत्र पवनसूत नामा।।
नमस्कार मित्रांनो मी अंकुश नवघरे....
खरंतर हा लेख कधीपासून लिहायचं असं मनात होत, परंतु पपांचा आजारपणात वेळ मिळाला नाही, काल पपांसोबत रात्र हॉस्पिटल मध्ये घालवली, झोपायचे नव्हते आणि वेळही पापांचा सेवेबरोबरच समाजाच्या सेवेसाठीही सत्कारणी घालवायचा होता, म्हणून रात्रभर जागून हा लेख लिहून काढला. वरच्या ओळी वाचून तुम्हाला कळले असेलच की त्या हनुमान चाळीसा ह्या स्तोत्रातल्या ओळी आहेत. हनुमान चाळीसा बद्दल माहिती नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. हनुमान चाळीसा हे स्तोत्र संत तुलसीदास ह्यांनी लिहिलेलं असून ते इतके प्रसिद्ध आहे की कित्येक अबालवृद्धांना मुखोद्गत म्हणता येते. भूतबाधा, करणी, शनीची पीडा, आजारपण, कितीही जुनाट रोग इत्यादी समस्या हनुमान चाळीसाच्या नियमित केलेल्या पाठाणे कायमस्वरूपी संपतात अशी कित्येक लोकांची श्रद्धा आहे. सप्तचिरंजीवांपैकी एक असलेला महाबली रामभक्त हनुमान त्याचे स्तोत्र भक्तिभावाने वाचणाऱ्या आपल्या भक्तांचे अखिलसंकट हरण करून त्यांना सुख समृद्धी प्रदान करतो. कलियुगात गणपती, हनुमान,देवी, सर्व दत्तावतार हे त्वरित फळ देणाऱ्या देवता मानल्या गेल्या आहेत. हनुमान चाळीसा चे १५००० पाठ नियमित पणे, विशिष्ट संख्येत आणि एकाच जागेवर बसून केले असता ते सिद्ध होते अशी अनुभूती आहे, त्यानंतर कोणालाही त्याने पाणी अभिमंत्रित करून दिले असता संकटांचे निरसन करता येते. हनुमान चाळीसा ह्या स्तोत्रातली प्रत्येक ओवी हा एक मंत्रच आहे, आणि तो स्वतंत्र्यपणे ही सिद्ध करून त्यात उल्लेख आलेल्या बाधेचे निरसन करता येते. जसे "नासे रोग हरे सब पिरा। जपत निरंतर हनुमत बिरा।।" ही ओवी जरी सिद्ध ना करताच रोज १०८ किंवा १००८ वेळा जशी रोगाची तीव्रता असेल त्याप्रमाणे म्हटली असता जुनाट आजार बरे झाल्याची खूप उदाहरणे पाहायला मिळतील. तसेच, "संकट ते हनुमान छुडावे। मन क्रम बचन ध्यान जो लावे।।" ह्या ओवीचेही वरील प्रमाणेच अनुष्ठान केले असता कुठलेही संकट चुटकीसरशी दूर होते.
एक साधारणतः १५ दिवसांपूर्वी घडलेली गोष्ट. माझ्याकडे एक ताईंनी सल्ला मागितला होता, त्या ताई आपल्या ग्रुपवर आहेत, वेळ प्रसंगी त्या समोर येतील परंतु सध्या नाही कारण ती गोष्ट तशी सेन्सेटीव्ही आहे. त्यांनी मला सांगितले की त्यांचे काका एक मोठ्या पातपेढीच्या संचालक पदावर सध्या काम करत असून, त्या पातपेढीत काही जणांनी मिळून खूप मोठा आर्थिक घोटाळा केला होता. काकांनी काहीच केले नसल्याने त्यांना वाटले की त्यांच्यावर काहीच बालंट येणार नाही, परंतु झाले उलटेच, चोर सोडून संन्यासाला फाशी ह्या उक्ती प्रमाणे खऱ्या चोरांना पकडायचे सोडून काकांनाच खोट्या केस मध्ये गोवण्यात आले आणि त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघाले. त्यांना जेव्हा ह्याची कल्पना आली तेव्हा त्यांनी तातडीने अटकपूर्व जमीन घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली परंतु, माननीय सत्र ज्ञायालयाने त्यांची विनंती फेटाळून लावली आणि त्यांच्यावरचे अटकेचे वॉरंट कायम ठेवले. त्याविरोधात त्यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयात अपील केली असता, मानानिय उच्च न्यायालयाने ते वॉरंट कायम ठेवत वरतुन त्यांना जवळजवळ ४.५ कोटी रुपये भरायचा आदेश पारित केला. इतकी मोठी रक्कम भरण्याचे ऐकून काकांची मानसिक स्थिती खूपच खालावली, परंतु रक्कम भरण्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठलाही उपाय नव्हता, म्हणून त्यांनी जामीन मिळवण्यासाठी सतत प्रयत्न चालूच ठेवले होते. अशातच त्यांच्या पुतण्या म्हणजे त्या ताई माझ्याकडे आल्या त्यावेळी जवळजवळ घटनेला ६ महिने उलटून गेले होते आणि काकांवर केसची पकड अजूनच आवळली गेली होती, कारण त्यांच्यावर वॉरंट असल्यामुळे ते लपून बसून अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे त्यांना त्यांची बाजू सक्षमपणे कोर्टासमोर मांडता येत नव्हती.
त्या ताईंनी मला विचारले की आपण ह्यावर काही दैवी उपाय करू शकतो का? त्यावर सर्वप्रथम मी त्यांना केस पेपर पाहण्याचीच विनंती केली परंतु ते सर्व पेपर त्यांच्या काकांकडे असल्याने लगेच मिळू शकणार नव्हते आणि लवकरच चार्जशीट फाईल होणार असल्याने वेळ खूपच कमी राहिला होता, म्हणून मी त्यांना एक उपाय सुचवला, हा उपाय मी आधीही २ जणांना सुचवला होता आणि त्यांना त्याचा फायदा झाला होता, परंतु ही केस हायप्रोफाइल असल्याने मनात जरा आशंका निर्माण झाली होती. परंतु मला माझ्या देवावर, म्हणजेच हनुमंत रायावर खूपच विश्वास असल्याने, मी त्यांना तो उपाय करायला सांगितला, तो उपाय म्हणजे हनुमान चाळीसा मध्ये एक कडवं आहे, "जो शत बार पाठ कर कोई।, छूटही बंदी महा सुख होई।।" ह्याचा अर्थ असा होतो की हनुमान चाळीसा चे एक जागेवर बसून, एकाच दिवसात १०० पाठ करेल तो किंवा त्याने संकल्प घेऊन ज्याच्यासाठी पाठ केला आहे तो कुठल्याही बंधनातून त्वरित मुक्त होईल. त्यानंतर मी त्या ताईंना पुढे काय झाले हे कळवायला सांगितले होते, व नंतर मी ही गोष्ट विसरून गेलो होतो. त्यानंतर बरोबर आठच दिवसांनी ताईंचा मला फोन आला आणि त्यांनी मला चांगली बातमी दिली की काकांना कोर्टाने जामीन मंजूर केली होती, आणि त्यांना ४.५ कोटी ऐवजी सध्या ४ लाख भरायला सांगितले होते. शेवटी सत्याचा विजय हा कुठे ना कुठे होतोच, आणि बाजू सत्याची असेल तर देव त्याला साथ देतोच.
त्या ताईंनी मला सांगितले आहे की कोर्टाचे प्रकरण असल्याने सध्या कोणाचेही नाव टाकू नका, परंतु वेळप्रसंगी त्या स्वतःच हा अनुभव तुमच्या सर्वांसमोर आणतील कारण आता त्यांनाही हनुमान चाळीसा वर पूर्ण विश्वास बसला आहे. असे हे हनुमान चाळीसा स्तोत्राचे प्रत्येक कडवे हे एक मंत्र असून संपूर्ण हनुमान चाळीसा हा एक महामंत्रच आहे. परंतु ते वाचण्याचे काही नियम आहेत, सिद्धी प्राप्त करण्यासाठी वाचणे आणि सरसकट वाचणे ह्यात खूपच अंतर आहे, आणि तसे वाचण्याने तुम्हाला फायद्याच्या बदले तोटाच होऊ शकतो. कारण कुठलेही स्तोत्र हे एक ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे दैवी आलंबन असून त्याची शक्ती अफाट असते, त्या शक्तीशी तादात्म्य साधण्याची शक्ती आधी तुमच्या शरीरात निर्माण व्हावी लागते आणि तेव्हाच ते तुम्हाला योग्य ते फळ देऊ शकते अन्यथा एखादे स्तोत्रही तुमचे आयुष्य विपरीत करू शकते. मी साधारणतः वयाच्या सतराव्या वर्षांपासून ज्योतिष पाहण्याचा सराव चालू केला, ऐकायला थोड जास्त वाटेल परंतु हे खर आहे, मी ज्योतिषाच्या अभ्यासाची सुरवात हस्तरेखा पहाण्यापासून केली आणि नंतर पारंपरिक ज्योतिष शास्त्राचा सराव करायला सुरवात केली होती, मला माझ्या घरात हस्तरेखा शास्त्रवरच एक पुस्तक सापडलं होत, ते वाचून मी स्वतःचा हात पाहत असे आणि सराव करण्याचा प्रयत्न करीत असे, आमचे कृष्णमूर्ती ज्योतिष चे प्रकांड पंडित मानानिय डॉ. सावंत सर, (मुंबईत ह्यांना न ओळखणारा माणूस विरळच) नेहमी सांगतात की जो स्वतःचे भविष्य पाहू शकतो तो इतर कोणाचेही पाहू शकतो, म्हणून मी आधी स्वतःपासूनच सुरवात केली होती, हस्तरेखा पाहणे हा माझा छंदच बनला होता, त्यावेळीही माझी कित्येक भविष्य खरी होत होती (आताही होतात), तेव्हा मला एक गोष्ट नेहमी निदर्शनास येत होती की माझ्याकडे येणारे काही जातक हनुमान चाळीसा चे नियमित पाठ करणारे होते. काही ज्योतिषी त्यांना सर्रास ते करण्यासाठी सांगत असत. शनीची पीडा असो, की मग भूतबाधा, किंवा अजून काही, सरसकट दिवसातून चार ते पाच वेळा हनुमान चाळीसा चे पाठ करा असे उपाय सांगत असत. त्यातलाच एक जातक माझ्याकडे मार्गदर्शना साठी आला होता, त्याचे लग्न जमत नव्हते, जातीने गुजराती होता, त्यांच्यात शक्यतो लवकर लग्न होतात, परंतु ह्याची पस्तिशी ओलांडून गेली तरीही ह्याचे जमत नव्हते, मुंबईत स्वतःचे घर, चांगला व्यवसाय, सर्वकाही ठीक होते पण मुलींचा नकार. त्याला कोणीतरी माझा पत्ता दिला होता.
त्याची बाजू मी समजावून घेतली, परंतु त्याच्या हातावरच्या रेषांमध्ये, आणि त्याच्या जन्मपत्रिकेत काहीच दोष दिसत नव्हता, मग कारण काय होते. शेवटी कंटाळून मी २ मिनिटांसाठी डोळे मिटले आणि भृमध्यावर ध्यान केंद्रित केले तेव्हा मला महाबली हनुमान दिसू लागले, आणि त्यांची मुद्रा क्रोधीत वाटत होती, त्यावर मी त्या जातकाला सहज विचारले की तुम्ही हनुमान चाळीसा किंवा दुसरे कुठले हनुमान स्तोत्र वाचता का. त्यावर तो आश्चर्यचकित झाला व म्हणाला की मला वारंवार नजर लागते असे सांगून एक ज्योतिषाने रोज दिवसातून कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त ११ वेळा हनुमान चाळीसा चा पाठ करायला सांगितला आहे, आणि मी हे कित्येक वर्षांपासून करत आहे. ते ऐकून माझ्याही कपाळावर थोड्याश्या आठ्या पडल्या. मी परत डोळे बंद केले असता मला श्री स्वामी समर्थ हा मंत्र दिसू लागला. मी त्याला म्हटले की आज पासून तुम्ही हनुमान चाळीसा चा रोज फक्त एक पाठ करायचा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जास्तीत जास्त जाप करायचा. त्यावर तो म्हणाला की श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा मी रोज १०८ वेळा जाप करतो. मी त्याला म्हटले की आता दिवसातून जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जाप करायचा. त्यानंतर बरोबर ३ महिन्यांतच त्याच लग्न जमल आणि झालं ही. हा अनुभव संगण्यामागे माझे तात्पर्य काय होते हे जाणकारांनाच नाही तर सर्वानाच कळले असेल अशी आशा करतो. कुठल्याही स्तोत्राचा किंवा मंत्राचा जाप करत असताना आपल्या शरीरात त्या मंत्र देवतेचा आविष्कार होत असतो. हा अनुभव पारायण काळात तुमच्यापैकी कित्येकांना आलेला असेलच. त्यामुळे काही प्रमाणात त्या देवतेचे गुण, सामर्थ्य आपल्यामध्ये येत असते. त्यामुळेच हनुमान चाळीसा ह्या स्तोत्राचे अति प्रमाणात पाठ केल्याने त्या जातकाला काही प्रमाणात लग्नाविषयी अनीच्छा निर्माण झाली होती, तसेच त्यात ब्रम्हचर्यत्व निर्माण होत होते, त्यामुळे निसर्गतःच त्याचे लग्न मोडण्याचे कार्य होत होते, कारण महाबली हनुमान लग्न करण्याचा विचारच करू शकत नव्हते आणि तसाच स्वभाव त्या जातकाचा होत चालला होता. ह्या स्तोत्रात सर्वच मंत्रांचे अर्थ त्याच्या कामानुसार निदर्शनास येत नाहीत, त्यामुळे काही मंत्र सोडले तर इतर मंत्रांचे अनुष्ठान कसे करावे हे तुम्हाला जाणकारांन कडून जाणून घ्यावे लागेल. ह्या स्तोत्रात काही असेही मंत्र आहेत जे तुम्हाला संजीवन सिद्धी, पारद सिद्धी, आकर्षण सिद्धी, वशीकरण सिद्धी, लक्ष्मी सिद्धी, अदृष्टकरण सिद्धी, मोहन सिद्धी, सर्वकार्य सिद्धी, आणि अशा बऱ्याच सिद्धी मिळवून देऊ शकतात पण ते गुप्त आहेत म्हणजेच दिसत असूनही त्यांचे अर्थ वाचताना कळत नाहीत, त्यामुळे आपण सहजपणे त्यांचे अनुष्ठान करू शकत नाही. ह्यात मी सद्गुरू कृपेने जवळपास १६ मंत्रांची उकल करण्यात यश मिळवले आहे, परंतु त्याचा स्वतःसाठी कधी उपयोग केला नाही. धन्यवाद।
अॅड. अंकुश सू. नवघरे.
[26/04, 2:29 pm] Vithaldas Modagekar: हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
[02/05, 3:43 pm] Vithaldas Modagekar: 1 वाटी बडीशेप 1वाटी धने अर्धी वाटी जिरे ,गरजेनुसार खडी साखर सर्व कच्चे मिक्सर मधून एकदम बारीक करा ,ती पावडर डब्यात भरून तो डबा डायनिंग टेबलवर ठेवा,प्रत्येकाने दिवसातून दोन वेळा केव्हाही ग्लासभर पाण्यात घालून (2चमचे)घ्या.शरीरातील उष्णता खूप कमी होते,😊. खास उन्हाळ्या साठी.
[05/05, 12:52 pm] Vithaldas Modagekar: कोणत्या झाडाची पूजा केल्याने काय फळ मिळतात ..?
*तुळस* – *ज्या घरात रोज तुळशीची पूजा होते, *लक्ष्मी ते घर कधीच सोडून जात नाही. त्या घरात नेहमी सुख समृद्धी बनलेली असते.*
*पिंपळ* – *हिंदू धर्मात पिंपळाला पवित्र वृक्ष मानण्यात आले आहे. याची *पूजा केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते, तसेच विष्णूची कृपा सदैव तुमच्यावर राहते.*
*कडू लिंबं* – *याची पूजा केल्याने *पत्रिकेतील सर्व दोष दूर होतात व आजारांपासून मुक्ती मिळते. घरात सुख शांती कायम राहते.*
*वडाचे झाड* – *याला वडाचे झाड किंवा बरगद देखील म्हणतात. याची पूजा केल्याने *स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहतं आणि संतानं संबंधी समस्या दूर होण्यास मदत मिळते. हे फारच पवित्र झाड आहे.*
*बेलाचे झाड* – *या झाडाचे पान आणि फळ महादेवाला अर्पित केले जाते. याची *पूजा केल्याने नोकरीत बढतीचे योग लवकर येतात तसेच अकाल मृत्यूपासून रक्षा होते.*
*आवळा* – *या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते आणि *पूजा करणार्यांना धन संबंधी अडचण कधीच येत आहे. त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळत.*
*अशोक* – *या झाडाची पूजा केल्याने सर्व *प्रकारचे रोग दूर होतात आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहत. एखाद्या विशेष इच्छेसाठी देखील याची पूजा केली जाते.*
*केळीचे वृक्ष* – *ज्या लोकांच्या पत्रिकेत *गुरु संबंधित दोष असतील तर, त्यांनी या झाडाची पूजा केली तर त्यांना नक्कीच फायदा मिळतो. याची पूजा केल्याने विवाहाचे योग लवकर जुळून येतात.*
*शमी* – *या झाडाची पूजा केल्याने *शत्रूवर विजय मिळते व कोर्ट केसमध्ये यश मिळतात. दसर्याच्या दिवशी या झाडाची खास पूजा केली जाते.*
*लाल चंदन* – *सूर्याशी निगडित गृह दोष दूर करण्यासाठी *लाल चंदनच्या झाडाची पूजा विधिवत केली पाहिजे. असे केल्याने प्रमोशन होण्याचे योग बनतात.
[09/05, 9:00 am] Vithaldas Modagekar: लहान मुलांसाठी प्रोटीन पावडर
बाळाचे वजन वाढवण्यासाठी पौष्टिक आहार
काही बाळांचे वजन त्यांचा वाढत्या वयानुसार वाढत नाही. काही पोषक द्रव्ये आणि जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे असे होऊ शकते. तर काही नवजात बालकांची भूक जन्मापासूनच काहीशी मंदावलेल्या अवस्थेत असते. ही पालकांची जबाबदारी असते की बाळाला आवश्यक ती पोषकद्रव्ये आहाराद्वारे योग्य प्रमाणात मिळाली पाहिजेत. हे सर्व त्याच्या त्या पोषकद्रव्य युक्त पदार्थ किंवा धान्याचं स्वरूपामुळे अन्नाद्वारे बाळाला देणे नेहमी शक्य होईलच असे नाही, त्यासाठी त्याचे पीठ करून बाळाला दिले तर ते त्याला खाऊ घालणे सोप्पे होते. अशाप्रकारे बाळाच्या आहारावर तुम्ही लक्षही ठेवू शकता. बाजारात याच प्रकारचे तयार मिश्रण मिळतात पण त्यांच्यातून मिळणाऱ्या पोषणबाबत आपण खात्री देऊ शकत नाही
हे मिश्रण तयार करताना आपल्या बाळाला ह्यातील कोणते घटक चालतात , त्याला कशाची एलर्जी तर नाही ना याची खात्री करून घ्यावी.
येथे दिलं आहे बनवायला सोप्पं आणि पौष्टिक असं पिठाच मिश्रण जे तुमच्या बाळाला वजन वाढवण्यास आणि निरोगी ठेवण्यास मदत करेल.
साहित्य पदार्थ:
१. बदाम (१०० ग्राम)
२. काजू (१०० ग्राम)
३. अक्रोड (१०० ग्राम)
४. पिस्ता (१०० ग्राम)
५. वेलची (१०)
६. उडीद डाळ (२०० ग्राम)
७. मुग डाल (१५० ग्राम)
८. ओट्स (१५० ग्राम)
९. गव्हाचे सत्व (१५० ग्राम)
१०. तीळ (१५० ग्राम)
११. नाचणीचे पीठ (५०० ग्राम)
१२. सोयाबीनचे पीठ (२०० ग्राम)
कृती:
१.उडीद डाळ, मुगाची डाळ, गव्हाचे सत्व आणि ओट्स वेगवेगळे करून कढईत छान भाजणीचा वास लागेपर्यंत भाजून घ्या.
२.सगळा सुकामेवा भुरकट रंग येण्यासाठी एकत्र भाजा. भाजून झाल्यावर हे सर्व थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. प्रत्येक घटक हा कमीत कमी ३-४ मिनिटे भाजला गेला पाहिजे.
३.ह्यातील मुग डाळ, उडीद डाळ, गव्हाचे सत्व, ओट्स, तीळ, नाचणी, आणि सोयाबीन मिक्सर मधून काढून घ्या. ह्यांची बारीक पूड होईल असे बघा. ह्या सर्वांचे पीठ एकजीव करा. कमीत कमी ५-६ मिनिटे मिक्सर मधून फिरवा म्हणजे पीठ बारीक होईल. जर पीठ मऊ नसेल तर गरजेएवढे बारीक करा.
४.हे मिश्रण रेफ्रिजरेटर मध्ये ठेवा. काही काळानंतर येणारा खवट वास टाळण्यासाठी फ्रीज मधेच राहू दया.
हे पीठ थोडे गरम दुध आणि गुळ एकत्र करून दिल्यास त्याची चव छान लागते आणि वासही छान येतो. यात वापरलेल्या घटकांमुळे बाळाला हे खायला देखील आवडेल.
बाळाच्या आरोग्याची तुम्हाला असलेली काळजी या आहाराने नक्कीच दूर होईल. रोज हे पीठ योग्य त्या प्रमाणात तेवढे बाळाला खाऊ घाला. पौष्टिक आहाराने त्याच्या वजनात सकारात्मक वाढ दिसेल.
[11/05, 10:44 pm] Vithaldas Modagekar: नाथ संप्रदाय हा मंत्र शक्ती साठी पूर्वापार शक्तीशाली मानला गेला आहे नवनाथांनी लोककल्याणास्तव शाबरी विद्या स्थापित केली ...आजही निष्ठने हे मन्त्र सिद्ध केल्यास फळ देतात परंतु आजच्या विज्ञान युगात खूप कमी लोकं यावर विश्वास ठेवतात अशीच एक सोपी सर्वसामान्य माणसाला करता येणारी परंतु शक्तिशाली मन्त्र उपचार इथे देत आहे याचा फायदा जरूर करून घ्यावा.
आजच्या धावपळीच्या जीवनात कामामध्ये लोकांना डोकेदुखी.. किंवा शरीराचा एखादा अवयव दुखणं हे सामान्य होऊन बसल आहे यात काहींना लक्ष द्यायला सुद्धा वेळ नसतो असाच जर त्रास आपणास होत असेल आणि त्यात गोळी किंवा औषध आपणा जवळ उपलब्ध नसेल तर त्या दुखऱ्या भागावर आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करून मनोभावे ''ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः'"हा मंत्र मनात जपावा जप करताना तो मन्त्र त्या दुखऱ्या अवयवावर जाऊन आदळत आहे अशी कल्पना करावी
दुखणं काही मिनिटात कमी होऊन जातं ..अनुभूत असा मन्त्र आहे आणि माझा स्वनुभव पण आहे या बद्दल तरी
श्रद्धाळूनीं जरूर उपयोग करून घ्यावा.
||श्री गुरुदेव दत्त||
[16/05, 8:25 pm] Vithaldas Modagekar: ||प्रारब्धशुद्धी||
आध्यात्मात प्रगती करायची असेल, तर प्रथम प्रारब्धशुद्धी करावी लागते. प्रारब्ध शुद्ध केल्याशिवाय आध्यात्मात कधीही प्रगती होत नाही. प्रारब्धाचे मुख्य तीन मुख्य भेद आहेत.
||संचित||
मानवाच्या चित्तामध्ये पूर्वीच्या हजारो जन्मांचे संस्कार साठलेले असतात. त्याचप्रमाणे पूर्वीच्या हजारो जन्मांतील कर्माचे व वासनांचे गाठोडे या चित्तामध्ये साठलेले असते. या गाठोडयाला 'संचित' असे म्हणतात.
||प्रारब्ध||
संचितामधून या जन्मी जे काही मानवाने भोगायचे आहे त्याला 'प्रारब्ध' असे म्हणतात. या प्रारब्धानुसारच माणसाला बुद्धी होत असते. म्हणून बुद्धिकर्मानुसारिणी म्हंटले जाते.
||क्रियामाण||
या जन्मी मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मास 'क्रियामाण' कर्म म्हणतात. अर्थात, हे क्रियामाण कर्म पुन्हा संचितात जमा होत असते. व संचिताचे गाठोडे वाढतच असते. म्हणून प्रत्येक कर्म करतांना नीट विचार करून कर्म करावे व आपल्याला पाप लागणार नाही याची दक्षता घ्यावी.
संचित, प्रारब्ध, आणि क्रियामाण यांचे कार्य कसे चालते ते पुढील उदाहरणावरुन लक्षात येईल.
समजा, एखाद्या मनुष्याने त्याला आपण डॉक्टर व्हावे असे वाटू लागते. याला म्हणतात प्रारब्ध. हे प्रारब्धच त्याला डॉक्टर होण्याची प्रेरणा देत राहते व मला डॉक्टर व्हायचे आहे अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण करते. डॉक्टर होण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होतात. तो खुप मन लावून अभ्यास करु लागतो व एक दिवस डॉक्टर बनतो. याला म्हणतात 'क्रियामाण'.
आजही भारतात असे ज्योतिषी आहेत की, जे कुंडली पाहताच डॉक्टर होणार की, वकील होणार, इंजिनिअर होणार की, आचारी होणार, हे अचूक सांगतात. मानवी जीवनातील सर्व गोष्टी या प्रारब्धाधीन आहेत व आध्यात्मात प्रगती जर हवी असेल, तर मुळावर घाव घालणे अतिशय आवश्यक असते. ही प्रारब्धशुद्धी कशी करायची हे आता पाहूयात.
दररोज किमान दोन तास जप किंवा एखाद्या स्तोत्राचे पाठ करायला हवेत. (एक तास सकाळी व एक तास संध्याकाळी.) या साधनेने हळूहळू प्रारब्धशुद्धी व्हायला सुरवात होते.
||दान||
आपल्या उत्पन्नातील किमान २० टक्के रक्कम दानधर्मात खर्च करायला हवी. याने प्रारब्धाची शुद्धी होते व लक्ष्मी स्थिर होते. दानाने धनाची वृद्धी होते व केलेल्या कार्यात यश प्राप्त होते. वेद शास्त्रे व अठरा पुराणे या सर्वांमध्ये दानाचा महिमा वर्णन केलेला आहे. सर्वसाधारण ईश्वरी महिमा असा आहे की, एखाद्या घराण्यामध्ये लक्ष्मी जास्तीत जास्त ६० वर्षे राहते. घराण्यातील पूर्वज जर जास्तच पुण्यवान असतील, तर लक्ष्मी ७५ वर्षांपर्यंतसुद्धा राहते. या कालावधीत पुण्याईचा क्षय होत असतो. घराण्यामध्ये कोर्ट-कचेऱ्या, भांडणे, कलह, पिशाच्च शक्तींचा उपद्रव, अशा प्रकारचे त्रास सुरु होतात. शेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते घराणे लोटले जाते. लक्ष्मी निघून जाते व अहंकार, दारिद्र्य व दुर्गुण घराण्यात शिल्लक राहतात. धन, यश, किर्ती, ऐश्वर्य, विद्या, सत्ता, सौंदर्य, सामर्थ्य या सर्व गोष्टी पूर्वपुण्याइने प्राप्त होत असतात व पूर्वपुण्याई ही दैनंदिन मानवी जीवणामध्ये रोजच खर्च होत असते. याकरिता पुण्याई सतत वाढवीत राहणे आवश्यक असते. ईश्वरचिंतन व दान याने पुण्याई वाढत राहते. म्हणून सतत ईश्वरचिंतन व दान करत राहायला हवे.
धनवानांनो ! या चंचल लक्ष्मीवर कधीही विश्वास ठेवू नका. अहंकार, घमेंड, स्वार्थ व लोभ अशा अनेक दुर्गुणांना बरोबर घेऊन ही लक्ष्मी आपल्या घरी येते. व ती जेव्हा जाते तेव्हा अनेक दुर्गुणांना आपल्या घराण्यात सोडून जाते, असे विद्वान लोकांचे म्हणणे आहे; परंतु खरी गोष्ट अशी आहे की, अपुऱ्या पुण्याईमुळे धन आल्यानंतर माणसाला अहंकार होतो व अहंकार सर्व दुर्गुणांना जन्म देतो. भरपूर पुण्याई असेल, तर खऱ्या अर्थाने लक्ष्मी प्रसन्न होते व लक्ष्मी प्रसन्न झाली असता ऐहिक, पारमार्थिक उन्नती होते.
||निरपेक्षता||
अपेक्षा हे सर्व दुःखांचे मूळ आहे. कोणाकडून कसलीही अपेक्षा करु नये. अगदी परमेश्वराकडून कसलीही अपेक्षा करु नये. आध्यात्मात प्रगती होण्यासाठी निरपेक्षता या गुणाची जोपासना करणे अत्यंत आवश्यक असते. निःस्वार्थ बुद्धी जेव्हा परिपक्व होते. तेव्हा तिला निरपेक्षता म्हणतात. निरपेक्षतेने अखंड समाधान प्राप्त होते. अन्तःकरण इतके विशाल होते की, प्रत्यक्ष परमेश्वर ह्रदयात येऊन राहतो. अशा विशाल हृदयाच्या भक्तांविषयी श्री ज्ञाणेश्वर माऊली म्हणतात.....
ययापरी पार्था | माझिया भजनी आस्था || तरी तया ते मी माथा | मुकुट करी ||
अथवा
देखे साधक निघोनी जावे | मागा पाउलांची ओळ राहे || तेथे ठायी ठायी होये | आणिमादिक |
लेखक
स्वामी दत्तावधूत
[28/05, 10:33 pm] Vithaldas Modagekar: मांसाहार्यांकडे आध्यात्मिक अधिकाराच्या वा प्रगतीच्या दृृष्टीने तुच्छपणाने पाहणे वास्तववादी नाही.
स्वतः गौतम बुद्ध मांसाहारीच होते. त्यांचे शेवटचे भोजनात चुंदा लोहाराच्या घरी डुकराचे मांस होते. स्वतःच्या खाण्याकरता सजीवहिंसा करू नका पण जर खास तुमच्याकरता एखाद्या सजीवाला मारून सामिष भोजन बनवलेले नसेल तर असा मांसाहार त्यांनी भिक्षुसंघाकरता स्विकारार्ह सांगितला होता.
गुरूचरित्रात मलंग वेषधारी दत्तगुरू मांस शिजवून खात असे उल्लेख आहेत. संत एकनाथ चरित्रातही जनार्दनस्वामी व बाल एकनाथांना दत्तात्रेयप्रभुंनी मलंगवेषात दर्शन देऊन मांसाहारी सहभोजन केल्याचा उल्लेख नाथचरित्रात येतो.
शाकाहारी सर्वच लोक आध्यात्मिकदृृष्ट्या स्वर्गाला हात पोहोचलेले नसतात व मांसाहारी सर्वच लोक पापाचे पुतळे नसतात.
आहार प्रत्येकाच्या श्रद्धेचा, प्रकृृतीचा, देश-काल-ृृृृऋतुचा, जीवनशैलीचा व आवडीचा भाग आहे!
आहारावरून एखाद्याची आध्यात्मिक वा वैयक्तीक कुवत जोखण्यापेक्षा त्याच्या कर्मांवरून, विचारांवरून साधनेवरून ओळखावी! तीर्थयात्रा पारायणं पूजाअर्चा हेच केवळ करणारा माणूस आध्यात्मिक नसतो. शम-दम-करूणा-इंद्रियनिग्रह-तत्वमसि इ. वेदमहावाक्यांचा व्यवहारातही वापर, ज्ञानोपासना, चतुर्विधपुरूषार्थसाधना, क्षमाशीलता, सहवेदना, निष्कपटता यांवरून आध्यात्मिक प्रगती ओळखता येईल.
साधी गोष्ट आहे! तुम्ही वाहतुकीचे नियम पाळत नसाल, सचोटीने नोकरीव्यवसाय करत नसाल, संधी मिळताच समोरच्याच्या अज्ञानाचा, विश्वासाचा व अगतिकतेचा गैरफायदा घेत असाल, वागूनबोलुन समोरच्याला दुखावत असाल, अहंकारी माजुर्डे असाल तर व्यर्थ आहे तुमचे अध्यात्म-देवधर्मपरायणता-गुरुसेवा-जपतपव्रततिर्थयात्रा!
[17/06, 9:36 am] Vithaldas Modagekar: चार प्रश्न ????
●●●●●●●
एक राजा होता, तो कलेचा भोक्ता होता , अनेक विद्वान पंडित, ज्योतिषी, नकलाकार राजाने आपल्या आश्रयाला ठेवले होते, त्याना तो भरपूर मानधन द्यायचा आणि त्यांच्या कडुन ज्ञान मिळवायचा.
एकदा दरबार भरण्यापूर्विच तो दरबारात येऊन बसला. एकटाच असल्याने मनात विचार आला की मी राज्यकर्ता आहे राराज्य चालण्या करिता आम्हा राज्य कर्त्या ना काय काय करावे लागते , मग संपूर्ण विश्वाचा पसारा चालवणारा हा परमेश्वर तो ही काही करत असेल का ?
अशा प्रकारचा विचार करत असताना त्याच्या मनात चार प्रश्न आले आणि त्यांनी ते दरबारातील पंडितांना विचारायचे ठरवले . कारण या पंडितांना राजा हजारो रूपये मानधन देऊन पोसत होता.
दरबार भरला सर्व पंडितांना प्रणाम करून राजा म्हणाला , आज राज्य कारभाराची चर्चा बाजूला ठेवून माझ्या मनात काही प्रश्न आहेत त्या वर चर्चा व्हावी, पंडित म्हणाले राजा विचार तुझे प्रश्न ?
राजा म्हणाला माझा पहिला प्रश्न आहे
1 ) देव काय खातो ?
2 ) देव काय करतो ?
3 ) देव राहतो कुठे ?
4 ) देव हसतो का ? आणि
हसत असेल तर का हसतो ? मित्रांनो हे ते चार प्रश्न आहेत , करा चिंतन आणि द्या उत्तर पटापट.
त्या पंडितांनी काय उत्तर दिले ? राजाचे समाधान झाले का ? फार सुंदर विषय आहे.
दरबार भरला राजाने सर्व पंडितांना प्रणाम करून वरिल चार प्रश्न विचारले. काही पंडितांनी दिलेले ऊत्तर
पहिला प्रश्न देव काय खातो?
पंडित म्हणाले देव भक्ति भावाने काहीही दिले तरी तो खातो .
पत्रं पुष्पं फलं तोयं योमे भक्त्या प्रयच्छति।
भगवान म्हणाले पत्रं म्हणजे पान , पुष्पं म्हणजे फुल, फलं म्हणजे फळ आणि तोयं म्हणजे पाणी हे सर्व भक्ति भावाने दिले तर मी खातो पण राजा म्हणाला हे ठीक आहे, पण त्याला काय खायला आवडते ? जसे कोणाला आमरस आवडतो , कोणाला श्रीखंड , कोणाला बासुंदी तसे देवाला काय खायला आवडे ? पंडितांना याचे समर्पक ऊत्तर देता आले नाही.
दुसरा प्रश्न देव काय करतो ? याही प्रश्नाचे उत्तर पंडितांना देता आले नाही.
तिसरा प्रश्न - देव राहतो कुठे? तर या प्रश्नाचे उत्तर काही प्रमाणात पंडितांनी बरोबर दिले पण राजाचे समाधान झाले नाही. ते ऊत्तर थोडक्यात असे आहे
पंडितांनी दिलेले तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर
पंडित म्हणाले की देव सर्वत्र आहे, एकदा नारदांनी च हा प्रश्न देवाला च विचारला होता की देवा तू राहतोस कुठे ? मी तुझ्या भक्तांना तुझा कुठला पत्ता सांगु ? देव म्हणाले
नाहं वसामि वैकुंठे योगीनामह्रदयेरवौ ।
मद् भक्ता यत्र गायंती तत्रतिष्ठामि नारद ।
थोडक्यात जिथे माझे कीर्तन चालू आहे तिथे मी तिष्ठामि म्हणजे ऊभा आहे. पण या ऊत्तराने राजाचे समाधान झाले नाही.राजा म्हणाला त्याला कुठे रहायला आवडते ते सांगा ?
पंडितांना सांगता आले नाही.
चवथा प्रश्न देव हसतो का ?आणि हसत असेल तर का हसतो?
याही प्रश्नाचे उत्तर पंडितांना आले नाही.
राजा संतापला , सगळ्या पंडितांना हाकलुन दिले आणि सांगितले की पुन्हा अभ्यास करा आणि जो पर्यंत माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत दरबारात येऊ नका .
प्रधानाला आज्ञा केली की प्रधानजी आपला घोडा सज्ज करा , घोड्यावर स्वार होऊन आपल्या राज्यात तच नव्हे तर राज्याच्या बाहेर जावे लागले तरी चालेल पण एखादा असा पंडित शोधून आणा की जो माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल . जर माझ्या सर्व प्रश्नांची समर्पक ऊत्तरे मिळाली तर मी माझं अर्ध नव्हे सगळं राज्य मी त्याला देईन , आणि जर असा कोणी पंडित भेटला नाही तर तुम्हीही परत येऊ नका .
प्रधानजी घोड्यावर स्वार होऊन निघाला बराच प्रवास केल्यावर तो एका शेताच्या बांधावरून चालला होता , वे ळ दुपारची होती , शेतकऱ्याने नांगर सोडून बैलांना चारा पाणी करून जेवणा करिता भाकरीची शिदोरी सोडली एवढ्यात त्याला शेताच्या बांधावरून जाणारा प्रधान दिसला
शेतकऱ्याने प्रधानाला हाक मारली ओ ऽऽऽऽ पावनं आहो ही जेवायची वेळ आहे प्रवासाची नाही. तुम्हाला भूक लागली असेल तशी घोड्यालाही भूक लागली असेल, घोड्याला चारा पाणी करा आणि तुम्हीही माझ्यातली आर्धि भाकरी खा विश्रांती घ्या आणि मग पुढे जा . प्रधानाला पटले घोडा झाडाखाली बांधुन चारापाणी करून तो भोजना करिता शेतकऱ्या समोर बसला .
भोजन करित असताना शेतकरी म्हणाला महाराज तुम्ही कोणीतरी अधिकारी आहात पण काही तरी विवंचना आहे, काय विवंचना आहे ते सांगाल का ?
प्रधानजी शेतकऱ्याला म्हणाले की तुम्हाला नाही कळणार काय विवंचना आहे ते
शेतकरी म्हणाला अरे सांगशिल कि नाही काय मनात आहे ते.कोणालातरी सांगितल्या शिवाय मन हालके होत नाही.
तेंव्हा प्रधान म्हणाला मी एका राजाचा प्रधान आहे, राजाला चार प्रश्नांची उत्तरे हवि आहेत , समाधान कारक ऊत्तर मिळाले तर महाराज त्याला संपूर्ण राज्य देणार आहेत ,
शेतकरी म्हणाला काय प्रश्न आहेत ? प्रधान म्हणाला
1) देव काय खातो?
2 ) देव काय करतो?
3 ) देव राहतो कुठे?
4) देव हसतो का? आणि हसत असेल तर का हसतो?
शेतकरी म्हणाला अरे सोपी आहेत ऊत्तरं
प्रधान : तुम्हाला येतात ?
शेतकरी : येत असल्याशिवाय सोपी म्हणालो का ?
प्रधान : मग मला सांगाल ?
शेतकरी : नाही सांगणार कारण मी दिलेली ऊत्तरं तू राजाला सांगशील राजा तुला राज्य देईल , मला काय मिळणार ?
प्रधान-: मग तुम्ही माझ्या बरोबर येऊन राजाला ऊत्तर सांगाल का ?
शेतकरी -: का नाही सांगणार चल आता जाऊ या राजवाड्यात आणि ते दोघे प्रधानाच्या घोड्यावर बसून दोघेही निघाले.
प्रधानजी ने राजाला सांगितले की महाराज आपल्या प्रश्नाची उत्तरे देणारा कोणी पंडित भेटला नाही पण एक शेतकरी भेटला आहे, त्याला मी आणलं आहे.
राजा म्हणाला पाठव त्याला इकडे.
राजाने शेतकऱ्याला पहिला प्रश्न विचारला देव काय खातो ? तेव्हा शेतकरी म्हणाला राजा दरबार भरव आणि सर्वाच्या समक्ष हाच प्रश्न पुन्हा दरबारातील पंडितांना विचार जर त्यांना नाही आला तर मी देणार आहेच
त्या प्रमाणे दरबार भरला . राजाने पहिला प्रश्न सगळ्या पंडितांना विचारला पण कोणाला ही ऊत्तर आले नाही, सगळ्यांच्या माना खाली गेल्या. मग शेतकऱ्याने ऊत्तर दिले की
राजा देवाला भक्तीभाने काहीही दिले तरी तो खातो,
पत्रं पुष्पं फलं तोयं योमे भक्त्या प्रयच्छति ।
पण तुझा हट्ट आहे त्याला काय खायला आवडते? तर त्याला माणसाच्या ह्रुदयातील गर्व, अहंकार खायला आवडतो , अहंकार हेच ईश्वराचं खाद्य आहे. म्हणूनच कोणाचाही अहंकार टिकत नाही.
राजा म्हणाला पटवून द्या
शेतकरी म्हणाला ज्या पंडितांना हजारो रूपये मानधन देऊन पोसत होतास त्या पंडितांना या प्रश्नाचे उत्तर न आल्या मुळे सगळ्यांच्या माना खाली गेल्या. माना खाली जाणे म्हणजेच अहंकारातून गळून पडणे .
राझाचे समाधान झाले. राजा म्हणाला दुसर्या प्रश्नाचे उत्तर द्या.
शेतकरी म्हणाला राजा आधि प्रतिज्ञा पाळ , तू राज्य देईन म्हणाला होतास ते आधि दे
पण माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली तर ?
मी तुला राज्य परत देऊन निघून जाईन, पण राजा तू शब्द पाळला नाहीस तर ?
दिलेला शब्द वारंवार बदलतात त्याला राज्यकर्ता म्हणतात
राजाने संकल्प करून शेतकऱ्याला राज्य दिले . राजमुगुट घालून शेतकरी राजसिंहासनावर बसला राजा शेतकऱ्याच्या जागी ऊभा राहिला.
सिंहासनावर बसलेल्या शेतकऱ्याने राजाला दुसरा प्रश्न विचारायला सांगितले.
राजा म्हणाला माझा दुसरा प्रश्न आहे, देव काय करतो?
शेतकरी म्हणाला देव हेच करतो , एका क्षणात रावाचा रंक व रंकाचा राव करतो .
तृमाचा पर्वत व पर्वताचा तृण करतो आणि हे जो करतो त्याला देव म्हणतात. राजा काही क्षणापूर्वि मी रंक होतो तू राजा होतास . आता मी राजा आहे तू रंक झालास , देव हे करतो
तिसरा प्रश्न - देव राहतो कुठे?
शेतकरी म्हणाला तो सर्वांतर्यामी आहे.
भू जल तेज समीर ख रवि शशी काष्ठादिकी असे भरला ।
स्थिरचर व्यापुन अवघा तो परमात्मा दशांगुले ऊरला ।
वसे ह्दयी देव तो जाण ऐसा ।
नभाचे परि व्यापकु जाण तैसा ।
सदा संचला येत ना जात नाही ।
रिताठाव या राघवेवीण नाही । ।
पण त्याला कुठे रहायला आवडते ? तर त्याला माणसाच्या ह्रुदयात रहायला आवडते त्याही पेक्षा ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे अशा ह्रुदयात त्याला राहयला आवडतं आणि असं ह्रदय संतांचं असतं . म्हणून देव संतांच्या ह्रुदयात राहतो
चवथा प्रश्न- देव हसतो का? आणि हसत असेल तर का हसतो?
देव लहान मूल नाही आणि वेडा मूळीच नाही तरीही तो हसतो कारण त्या हसण्याला कारण आहे.
राजाने शेतकऱ्याला चवथा प्रश्न विचारला देव हसतो का? आणि हसत असेल तर का हसतो?
शेतकरी म्हणाला राजा देव हसतो आणि त्या हसण्याला कारण आहे, कारणाशिवाय या जगात दोघेच हसतात एक पाळण्यातलं लहान मूल आणि दुसरा रस्त्यावरुन फिरणारा वेडा हे दोघेही कारणाशिवाय हसतात.
देव आमच्या वागण्याला हसतो . वास्तविक पाहता आमची आमच्या देहावर सुद्धा सत्ता नाही तरी पण आम्ही हे माझं आणि ते माझं म्हणून सगळ्यावर सत्ता गाजवत असतो त्या गाजवण्याला देव हसतो . या सर्व जगावर मृत्युची सत्ता आहे.
राजाचे समाधान झाले. शेतकरी सिंहासनावरून खाली ऊतरला , आपल्या डोक्यावरील राजमुगुट काढून राजाच्या मस्तकावर घातला आणि म्हणाला राजा मला तुझे राज्य नको काय करणार मी त्याचे . मी जरी शेतकरी असलो तरी मी एक ब्राह्मण आहे, ब्राह्मणानी राज्य करायचं नसतं तर त्याने अखंड ज्ञानार्जन करायचं असतं, अशा ब्राह्मणांचं रक्षण तुझ्या सारख्या क्षत्रियाने करायचं असतं शेतकरी पुन्हा आपल्या गावी निनिघून गेला.